MP ByPoll Result: 20 जागांवर भाजप आघाडीवर, काँग्रेसला धक्का
बिहारनंतर मध्यप्रदेशातही काँग्रेसला जोरदार धक्का
भोपाळ : मध्यप्रदेशच्या 28 विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु झाली आहे. मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांचं सरकार कायम राहणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपल 16 ते 18 जागा मिळण्याची शक्यता होती. तर काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळण्याता अंदाज वर्तवला जात होता. मध्यप्रदेशमध्ये 3 नोव्हेंबरला निवडणूक झाली होती.
भाजपचे नेते खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपच्या उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. तसेच मतदारांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत राज्याच्या जनतेचे आभाऱ मानले आहे. त्यांनी म्हटलं की, 'जनतेने पुन्हा एकदा विकास आणि जनकल्याणचा संकल्प ठेवणाऱ्या भाजपला मध्यप्रदेशची जबाबदारी दिली आहे. हे स्पष्ट दिसत आहे.'
मध्यप्रदेशमध्ये सध्या भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 7 आणि बीएसपी एक जागेवर आघाडीवर आहे.
मार्चमध्ये एकूण 25 काँग्रेस आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये आले होते. त्यामुळे काँग्रेसची संख्या कमी झाल्याने राज्यातील सरकार पडलं होतं. 25 आमदारांचा राजीनामा तसेच 3 आमदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागा अशा एकूण 28 जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
मध्यप्रदेशमधील सध्या स्थिती
भाजप - 107
काँग्रेस - 87
बसपा - 02
सपा - 01
अपक्ष - 04
रिक्त - 01
एकूण जागा - 230
बहुमताचा आकडा - 115