भोपाल : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जेथे एकाच परिवारातील 6 लोकांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. यातील 2 जण गंभीर जखमी असून त्यांचे सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तसेच पोलीस घटनेची चौकशी करीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटूंबातील एक सदस्य नुकतेच तयार केलेल्या टॉयलेट टॅंकमध्ये सफाईसाठी उतरतो. अचानक त्याला विजेचा शॉक लागतो. शॉक लागल्याने त्याने जोरात किंचाळी मारली. त्यामुळे घरातील इतर सदस्यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतरांनीही विजेचा तीव्र शॉक बसला. त्यामुळे एकाच कुटूंबातील 6 जणांचा मृत्यू झाला.


या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत. कुटूंबाला शासनाकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. मृतांमध्ये लक्ष्मण अहिरवार, रामप्रसाद अहिरवार, मिलन अहिरवार, नरेंद्र अहिरवार, रामप्रसाद अहिरवार, विजय अहिरवार यांच्या सामावेश आहे.