Crime News : मध्य प्रदेशातील (MP Crime) सिवनी जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. रविवारी तीन अल्पवयीन मुलांना त्यांच्याच मित्रांची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन भावांसह तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या क्रूर हत्येनंतर (Crime News) पोलिसांनी (MP Police) तपास सुरु केला आहे. शुल्लक कारणावरुन ही हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, इतक्या क्रूर पद्धतीने करण्याची योजना कशी सुचली या विचारानेच अनेकांना धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात रविवारी हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिवनीच्या मगरकठा गावात तीन अल्पवयीन मुलांनी आपल्या मित्राचा सायकलच्या साखळीने गळा आवळून खून केला. आरोपींनी आधी 12 वर्षीय मित्राचा सायकलच्या साखळीने गळा आवळला. त्यानंतर डोक्यात दगडाने वार केले. इतक्यावरच न थांबता अल्पवयीन मुलांनी बकऱ्या कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार चाकूने त्याचा गळा चिरला. ही घटना समजताच एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सध्या तिन्ही आरोपींना बालसुधारगृहात पाठवले आहे.


धक्कादायक बाब म्हणजे तिथल्याच एका महिलेला या प्रकाराबाबत संशय आला. त्यामुळे अल्पवयीन आरोपींनी त्याचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून घराजवळील मातीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिला. यानंतर तीनही अल्पवयीन आरोपी फरार झाले. तिथून जाणाऱ्या एका महिलेला रक्ताने माखलेले प्लास्टिक दिसल्यानंतर तिने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी येथून घटनास्थळाची पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.


शुल्लक कारणावरुन झाली हत्या


सिवनी जिल्ह्यातील बरघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रसन्न शर्मा यांनी सांगितले की, तिन्ही अल्पवयीन मुलांचा मृत मित्रासोबत काही मुद्द्यावरून वाद झाला होता. त्यानंतर रविवारी अल्पवयीन मुलांनी एखाद्या सराईत गुन्हेगारांप्रमाणे त्याची निर्घृण हत्या केली.


तिन्ही आरोपींनी मित्राची हत्या करण्याचा कट रचला होता. त्यांनी मृत मुलाला निर्जनस्थळी बोलावून सायकलच्या साखळीने गळा आवळून खून केला. जेव्हा तो ओरडायला लागला तेव्हा त्याच्या डोक्यावर एका मोठ्या दगडाने हल्ला करण्यात आला.  त्यानंतर बकऱ्या कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार चाकूने त्याचा गळा चिरला. हत्येनंतर तिघांनी मुलाचा बाहेर फेकून दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना जाऊन पाहिले असता त्यांना 12 वर्षीय मुलाचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. मुलाचा मृतदेह पाहून ग्रामस्थांसह पोलिसांनाही धक्का बसला आहे. सोमवारी शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तर तिन्ही आरोपींना सिवनी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.