भोपाळ : मध्य प्रदेशातील २८ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीचे Madhya Pradesh By-Election Results) निकाल आज लागत आहेत. ही पोटनिवडणूक भाजपच्या शिवराजसिंह चौहान सरकार तसेच काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. २३० सदस्यांच्या विधानासभेत शिवराजसिंहचे सरकार सत्तेत राहिण्यासाठी किमान ९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. तर काँग्रेसला सत्तेत परतण्यासाठी सर्व २८ जागा जिंकाव्या लागतील. (Madhya Pradesh By-Election) सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप १४ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत कमलनाथ यांचे मध्य प्रदेशात पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार असे दिसत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावर्षी मार्चमध्ये काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर काँग्रेसच्या २२ आमदारांनीही कमलनाथ सरकारची साथ सोडली. या सर्वांनी विधानसभेच्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. कमलनाथ सरकार अल्पसंख्याक बनले आणि शिवराजसिंह चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. सिंधियामुळे भाजपची सत्ता आल्यावर त्यांनी आपल्या समर्थक नेत्यांना शिवराजसिंह सरकारमध्ये मंत्री बनवले. ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक ११ नेते शिवराजसिंह सरकारमध्ये मंत्री झाले. शिवराज सरकारमध्ये मंत्री असलेले सिंधिया समर्थक नेत्यांच्या पोटनिवडणुकीचा निकाल काय आहे?


शिवराजसिंह सरकारमध्ये मंत्री असलेले सिंधिया समर्थक नेत्यांची काय आहे निवडणुकीत स्थिती?



भाजपचे तुळशीराम सिलावट सांवर आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे प्रेमचंद गुड्डू मागे आहेत


भाजपचे गोविंदसिंग राजपूत सुर्खी येथून आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे पारुल साहू मागे आहेत


भाजपच्या इमरती देवी डबरा यांनी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे सुरेश राजे पिछाडीवर आहेत.


भाजपचे प्रद्युम्नसिंह तोमर हे सांचीमधून पुढे तर काँग्रेसचे सुनील शर्मा मागे आहेत


भाजपचे प्रभूराम चौधरी सांचीमधून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे मदनलाल चौधरी मागे आहेत


भाजपचे ओमप्रकाश सिंह भदौरिया हे मेहगाव येतून पिछाडीवर आहेत, काँग्रेसचे हेमंत कटारे यांना आघाडी घेतली आहे.


भाजपचे गिरज दंडौतिया दिमनी पिछाडीवर असून, तर काँग्रेसचे रवींद्रसिंह तोमर यांनी आघाडी घेतली आहे.


भाजपचे सुरेश धाकड हे पोहरीतून मागे आहेत तर बसपाचे कैलास कुशवाह यांनी आघाडी घेतली आहे.


भाजपचे राज्यवर्धन सिंह बडनावर यांनी आघाडी घेतली आहे तर काँग्रेसचे कमल पटेल मागे आहेत


भाजपचे ब्रिजेंद्रसिंह यादव मुंगावली पुढे असून तर काँग्रेसचे कनाई राम लोधी मागे आहेत


बामौरीमधून भाजपचे महेंद्रसिंग सिसोदिया आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे कन्हैयालाल अग्रवाल मागे आहेत