नवी दिल्ली : कोरोना व्हायरस दिल्लीपर्यंत पोहोचल्यानंतर एकच खळबळ उडाली. नवी दिल्लीत कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. असं असताना आज संसदेत खासदार नवनीत राणा मास्क घालून आल्याच्या दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची लागण झालेले रूग्ण दिल्लीत आढळल्यानंतर आता ही संख्या वाढते की काय अशी भीती व्यक्त होऊ लगाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोहोचताना नवनीत राणा या चक्क मास्क घालून आल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी कोरोना व्हायरसची लागण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. असं असताना खबरदारी म्हणून नवनीत राणा यांनी मास्क घातला असल्याचं दिसत आहे. 



भारताच्या आरोग्य मंत्रालयाने इटली, ईराण, साऊथ कोरिआ, आणि जपानहून येणाऱ्या प्रवशांचा व्हिजा रद्द केला आहे. ३ मार्चनंतर या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना भारताचा व्हिजा नाकारण्यात आल आहे. कोरोना व्हायरसमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. 



दिल्लीतील ITBP कॅम्पमध्ये कोरोनाचे १५ रुग्ण आढळून आल्यानंतर सरकारी यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी यंदा होली मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे मोदींनी सांगितले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळावे, असा सल्ला अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे आपण यंदा होली मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.