Train Pulling Chain : काशी एक्स्प्रेसमध्ये (Kashi Express) वारंवार चेन पुलिंग होण्याच्या घटना वाढल्यानंतर आरपीएफ पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. भोपाळमधल्या खंडवा-इटारसी मार्गावर (Khandawa-Itarasi) ट्रेन अचानक थांबण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे आरपीएफ पोलिसांनी गुप्त मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला. यात ट्रेनमधल्या पँट्रीकार मॅनेजरलाच (PantryCar Manager) रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत जे कारण समोर आलं ते एकून पोलिसही हैराण झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणात पँट्रीकार मॅनेजरवर 141 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंत रेल्वेच्या नियमानुसार योग्य कारणाशिवाय चेन खेचल्याने 1 हजार रुपयांचा दंड किंवा एक वर्षाचा तुरंगास होऊ शकतो. 


ठराविक मार्गावर ट्रेन थांबायची
रेल्वे प्रशासनाने दिलेल्य माहितीनुसार भोपाळमधल्या खंडवा-इटारसी रेल्वे मार्गावर 15017 काशी एक्स्प्रेसमध्ये चेन पुलिंगच्या घटना मोठ्याप्रमाणावर वाढल्या होत्या. जवळपास दररोज चेन पुलिंगने ठराविक मार्गावर ट्रेन थांबत होती. तक्रारीव वाढल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली. चेन पुलिंग कोण आणि का करतंय याचा शोध घेण्यासाठी आरपीएफ पोलिसांना सूचना करण्यात आल्या. त्यानुसार प्रवाशांच्या वेषात पोलीस ट्रेनमध्ये तैनात झाले. खंडवा-बानापूर दरम्यान तब्बल चार वेळा चेन पुलिंगची घटना घडली.


एका दिवसात पाचवेळा चेन पुलिंग
त्यानंतर टिमरनी-बानापूर मार्गावर पुन्हा एकदा चेन पुलिंग झालं. ट्रेनमधल्या पोलिसांनी तात्काळ तपास केला असता ट्रेनमधल्याच पँट्रीकार मॅनेजर चेन पुलिंग करत असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी त्याला चेन खेचताना रंगेहाथ अटक केली. सूरज सिंह असं त्या पँट्रीकार मॅनेजरचं नाव असून तो उत्तरप्रदेशमधल्या महोबा इथला राहाणारा आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चेन खेचण्यामागचं कारण विचारलं.


पँट्रीकार मॅनेजरने सांगितलं हैराण करणारं कारण
पोलिसांच्या तपासात पँट्रीकर मॅनेजरने दिलेलं कारण हैराण करणारं होतं. ट्रेन नियोजित वेळेत पोहचल्यास पँट्रीमधल्या जेवणाची विक्री कमी होत होती. चेन पुलिंग केल्यामुळे ट्रेन इटारसी स्टेशनवर विलंबाने पोहोचत असे. त्यामुळे जेवणाची विक्री चांगली होत होती. ट्रेन थांबत-थांबत जात असल्याने प्रवासी पँट्रीमधलं जेवणाची ऑर्ड करत असत. पँट्रीकार मॅनेजरवर रेल्वे अधिनियम 141 आणि 145 अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु करण्यात आली आहे. 


तर केली जात कारवाई
धावत्या ट्रेनमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास भारती रेल्वे कोचमध्ये इमरजेंसी ब्रेकची व्यवस्था देण्यात आली आहे. आपातकालीन परिस्थितीत डब्यातील चेन खेचल्यावर ट्रेन तात्काळ थांबते. पण ठोस कारण असेल तरच चेन खेचण्याची परवानगी असते. पण कारण नसताना चेन खेचल्यास त्या व्यक्तीवर रेल्वे अधिनियमांतर्गत कारवाई केली जाते.