Mughal Kebab Controversy: सीख कबाब असो किंवा मटण कबाब हे ऐकून कट्टर नॉनव्हेज खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटले नाहीतर आश्चर्यच. कबाबचे नाव ऐकूनच भूक चाळवते. पण अलीकडेच कबाबसंदर्भात एक हैराण करणारा अहवाल समोर आला आहे. वाराणसीत राहणाऱ्या वर्तुल सिंह यांनी त्यांच्या पुस्तकात कबाबबाबत एक अनोखा दावा केला आहे. ज्यामुळं मुगल विरुद्ध वाराणसी असा वाद सध्या सुरू आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्तुल सिंह यांनी त्यांचे पुस्तक A JOURNEY IN TO THE HEART OF THE CITY मध्ये दावा केला आहे की, कबाब खरं तर मुगलांनी आणले नसून ते वाराणसी येथील आहेत. कबाब पहिल्यांदा 12व्या शतकात वाराणसी येथे तयार करण्यात आले होते. त्यानंतर जवळपास 300 वर्षांनी मुगल भारतात आले होते. पुस्तकात दावा करण्यात आला आहे की, वाराणसी येथे सलाई मसू ग्रिहा (salai masu griha) नावाचा एक पदार्थ होता. यात शिगेवर मांस चढवून ते बनवले जात होते आणि बनारसमध्ये ते खूप प्रसिद्ध होते. 


कबाब भारतात कसं पोहोचला याबाबत अनेक वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. काही जाणकार सांगतात की, ही तुर्कीची डिश आहे जी अफगाणच्या माध्यमातून भारतात पोहोचली. तर काही जाणकार सांगतात की, कबाब हा एक फारशी शब्द आहे. ज्याचा अर्थ तळणे किंवा भाजणे असा होता. उजबेकिस्तानच्या समरकंदयेथून कबाब भारतात पोहोचले आहेत. 


कबाबबाबत अशी देखील एक अख्यायिका आहे की, कबाबचा जन्म अशा ठिकाणी झालाय जिथे युद्ध झालेत आणि तिथे भटके लोक राहतात. ते लोक त्यांच्या सुविधेसाठी मांस भाजून खातात. ज्याला कबाब नाव दिलं आहे. अनेक इतिहासकार असा देखील दावा करतात की, मुगल भारतात येताना त्यांच्यासोबत ईराणचे स्वयंपाकी घेऊन आले होते. त्यांनीच कबाब नावाचा हा चविष्ट पदार्थ तयार केला होता. 


एक मान्यता अशी देखील आहे की, 17व्या शतकात औरंगजेबाने गोलकोंडाचा किल्ला जिंकला होता. त्यावेळी औरंगजेबासोबत असलेल्या सैनिकांनी नवीन शैली शोधून काढली. त्याला त्यांनी कबाब असे नाव दिले. 


कबाबचा इतिहास काय?


9व्या शतकात कबाबचा पहिल्यांदा नाव आले. कबाब हा एक फारसी शब्द असून त्याचा अर्थ तळणे असा आहे. फारसी साम्राज्यचे एक लोकप्रिय स्ट्रीट फूज होते. समरकंदमध्ये कबाब पहिल्यांदा बनवण्यास सुरुवात झाली. बकरीच्या मांसापासून कबाब बनवण्यात येत होते.