बाळाच्या जन्मानंतर सामान्य महिलांना होतो तो त्रास धनाढ्य ईशा अंबानीलाही चुकला नाही म्हणाली, `मुलांच्या जन्मानंतर...`
Isha Ambani on post childbirth health : मी फिट दिसत असले तरीही... मुलांच्या जन्मानंतर ईशा अंबानी पहिल्यांदाच स्वत:च्या फिटनेसबद्दल बोलली
Isha Ambani on post childbirth health : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी श्रीमंतीच्या शर्यतीत भल्याभल्यांना मागे टाकलं. आशियातील आणि जहगातील श्रीमंतांच्या यादीत ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं अशा या धनाढ्य, अंबानींच्या घराचं खऱ्या अर्थानं गोकुळ झालं आहे. कारण, (Reliance Group) रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा आता मुकेश अंबानी यांच्या घरी नातवंडांचाच किलबिलाट पाहायला मिळत आहे. आकाश अंबानी आणि ईशा अंबानी या दोन्ही मुलांच्या मुलांसमवेत अंबानींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळाले आहेत.
अंबानींची लेक, ईशा हिच्या मुलांसोबतचे त्यांचे फोटो आणि नातवंडांसोबत असणारं नातं तर कायमच लक्ष वेधून जातं. अशा या ईशा अंबानीनं नुकतंच तिच्या मातृत्तवाच्या प्रवासाबद्दल वक्तव्य करत नजरा वळवल्या. ईशाचा जवळचा मित्र आणि माध्यमांमध्ये कायमच चर्चेत असणाऱ्या ऑरिनं वोग फोटोशूटदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ईशानं बऱ्याच मुद्द्यांवर मोकळेपणानं चर्चा केल्याचं पाहायला मिळत आहे.
तू सध्या शारीरिकदृष्ट्या सक्षम स्थितीत नाहीत? असा प्रश्न ऑरिनं विचारला. लुई वुईटनचं जॅकेट फ्लाँट करताना, ईशा म्हणाली 'मी सध्या फारच फिट दिसत असले तरीही माझ्या शरीराची लवचिकता कमी झालीय. मी थकण्याच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचलेय'. मी आता 50 मीटर धावू शकत नाही, असं म्हणताना मुलांच्या जन्माआधी मी फार सक्षम आणि सुदृढ होते असंही तिनं सांगितलं.
हेसुद्धा वाचा : मुंबईच्या रस्त्यांवर दिसला अंबानी परिवाराचा शाही अंदाज! VIDEO का होतोय व्हायरल?
ईशा अंबानी आणि तिचा पती, आनंद पिरामल यांच्या वैवाहिक नात्यात 2022 मध्ये एक मुलगी आणि एक मुलगा अशा जुळ्या मुलांचं आगमन झालं आणि त्यांचं कुटुंब परिपूर्ण झालं. दरम्यान, ईशानं मांडलेल्या समस्या आणि शारीरिक क्षमतेवर तिनं मोकळेपणानं केलेलं वक्तव्य पाहता अगदी सामान्य महिलांनाही बाळाच्या जन्मानंतर ज्या समस्यांचा, शारीरिक आव्हानांचा सामना करावा लागतो ते तिलाही चुकलं नाही हेच स्पष्ट होत आहे.
गरोदरपणाच्या काळापासून प्रसूती आणि त्यानंतरच्या काळात महिलांच्या शरीरार अनेक बदल होत असतात. बाळाचा जन्म ही संपूर्ण प्रक्रिया फक्त शारीरिकदृष्ट्याच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही अनेकांसाठी थकवणारी बाब ठरते. त्यामुळं प्रसूतीनंतर किंवा बाळाच्या जन्मानंतर लहानग्यांसमवेत आईचीही काळजी घेतली जाणं तितकंच महत्त्वाचं.