Mukesh Ambani की Gautam Adani कोण सर्वात श्रीमंत? पाहा जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी
Richest men of world : भारतातील दोन प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी...या दोघांमध्ये कायम रस्सीखेच सुरु असतो. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कधी अंबानी तर कधी अदानी टॉपवर असतात.
Forbes Billionaires list : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani ) यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. मुकेश आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या धाकट्या मुलगा अनंत अंबानी - राधिका मर्चंट (Anant Ambani - Radhika Merchant) यांचा साखरपुडा झाला आहे. त्यामुळे लवकरच त्यांचाकडे लगीनघाई असणार आहे. दुसरीकडे अंबानी कुटुंबासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. मुकेश अंबानी यांनी गौतम अदानी यांना मागे टाकून सर्वात श्रीमंत आशियाई आणि भारतीय व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम (Forbes real-time) अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी $84.3 अब्ज संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 9व्या स्थानावर पोहोचले आहेत. तर गौतम अदानी $ 84.1 अब्ज संपत्तीसह 10 व्या स्थानावर घसरले आहेत.
हिंडेनबर्ग अहवालामुळे Gautam Adani यांना मोठा धक्का
अमेरिकेतील रिसर्च कंपनी हिंडेनबर्गने (Hindenburg Report) 24 जानेवारी 2023 ला गौतम अदानींसंबंधी अहवाल सादर केला आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहावर लबाडी आणि अनियमिततांचा आरोप केला आहे. या अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेससह सर्व समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Adani Group Shares) मोठी घसरण झाली आहे. यामुळे अदानी समूहाला $ 72 अब्जचा तोटा झाला आहे. दरम्यान आपल्या प्रमुख कंपनीचा 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ यशस्वी होईल, असा विश्वास अदानी यांनी व्यक्त केला आहे. (Mukesh Ambani or Gautam Adani who is the richest and Check out the list of top 10 richest people in the world for forbes)
जगातील 10 सर्वात श्रीमंत
फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, बर्नार्ड अरनॉल्ट हे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
1. बर्नार्ड अरनॉल्ट
2. इलॉन मस्क
3. जेफ बेझोस
4. लॅरी एलिसन
5. वॉरेन बफे
6. बिल गेट्स
7. कार्लोस स्लिम हेलू
8. लॅरी पेज
9. मुकेश अंबानी
10. गौतम अदानी