श्रीमंतांच्या यादीत अंबानी नंबर-1! अदानींना सोडलं मागे, संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का
Hurun India Rich List 2023 : Hurun India Rich List 2023 नुसार मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे सोडलं आहे. या यादीनुसार अदानी यांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतेय तर अंबानींच्या संपत्ती वाढ झाली आहे.
Hurun India Rich List 2023 : भारतात यावर्षी 2023 मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याचा खुलासा झाला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 जाहीर झाली आहे. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बाजी मारली आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहे. तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची घसरगुंडी झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता मुकेश अंबानी यांची संपत्ती 8 लाख कोटींहून अधिक झाली आहे. (mukesh ambani richest indian in hurun india rich list 2023 gautam adani second birla bajaj)
अदानी यांची घसगुंडी...
2023 मध्ये शॉर्ट शेलिंग कंपनी हिंडनबर्गच्या अहवालानुसार गौतम अदानी यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यामुळे अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये गेल्या वेळी अव्वल स्थानावर असलेले अदानी यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती पाहता यंदा त्या संपत्ती 57 टक्के घट झाली आहे. यावर्षी म्हणजे 2023 मध्ये अदानींची संपत्ती 4,74,800 कोटी एवढी आहे.
तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कोण?
तर हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 मध्ये तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांवर कोणता भारतीय उद्योजक आहे ते पाहूयात. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांवर सर्वात श्रीमंत सीरम इन्स्टिट्यूटचे प्रवर्तक पूनावाला आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 2,78,500 कोटी रुपये इतकी आहे. तर 2,28,900 कोटी रुपये संपत्ती असणारे एचसीएलचे शिव नाडर हे चौथ्या क्रमांकावर आहेत. पाचव्या क्रमांकाबद्दल बोलायचं झालं तर लंडनमध्ये राहणारे पण भारतीय गोपीचंद हिंदुजा यांची संपत्ती 1,76,500 कोटी एवढी आहे.
यंदा TOP-10 या दोघांची पुन्हा एन्ट्री
सन फार्माचे दिलीप सांघवी हे 1,64,300 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहे. स्टील किंग लक्ष्मी मित्तल 1,62,300 कोटी रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह सातव्या तर D-Mart चे राधाकिशन दमानी हे 1,43,900 कोटी संपत्तीसह यादीतील आठव्या नंबरवर आहेत.
तर यंदा अनेक कालावधीनंतर दोन उद्योजक पुन्हा टॉप-10 मध्ये स्थान पटकावलं आहे. ती दोन नाव आहेत, कुमार मंगलम बिर्ला आणि नीरज बजाज. बिर्ला यांची संपत्ती 1,25,600 कोटी रुपये असून ते नवव्या स्थानवर तर बजाज कुटुंब 1,20,700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह 10 व्या क्रमांकावर आहेत. या दोघांच्या एन्ट्रीने उदय कोटक आणि विनोद अदानी श्रीमंत यादीतून बाहेर पडला आहे.