मुंबई : देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. मात्र आता ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. सलग दोन वर्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी कंपनीकडून पगार घेतला नाही आहे. त्य़ामुळे नेमकं काय कारण आहे ज्यामुळे त्यांनी हा पगार घेतला नाहीये, ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड (RIL) ने आपल्या ताज्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की,  2020-21 या आर्थिक वर्षासाठी अंबानींचे मानधन 'शून्य' होते. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी जून 2020 मध्ये स्वेच्छेने 2020-21 चा पगार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आता मुकेश अंबानी यांनी 2021-22 मध्ये देखील एकही रुपयाचा पगार घेतला नव्हता. 


विशेष म्हणजे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दोन वर्षांपासून पगार घेतलेला नाही. या दोन्ही वर्षांत  त्यांनी रिलायन्सकडून कोणतेही भत्ते, अनुमती, सेवानिवृत्ती लाभ, कमिशन किंवा स्टॉक पर्यायांचा लाभ घेतला नाही.हा अहवाल आल्यानंतर मुकेश अंबानी यांनी एक आदर्श ठेवला आहे.


पगार न घेण्याचे कारण 
मुकेश अंबानी (Mukesh Ambani Salary) यांनी सलग दुसऱ्या वर्षी त्यांच्या प्रमुख कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून कोणताही पगार घेतला नाही.कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने अंबानी यांनी स्वेच्छेने आपले मानधन सोडले असल्याची एका अहवालात माहिती समोर आली आहे. 


पगार किती? 
2008-09 पासून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे वेतन 15 कोटी रुपये केले होते. त्याचे चुलत भाऊ निखिल आणि हेतल मेसवानी यांचे मानधन 24 कोटी रुपयांवर होते. यामध्ये 17.28 कोटी रुपयांचे कमिशन समाविष्ट आहे. कार्यकारी संचालक पीएमएस प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या मानधनात थोडीशी घट झाली आहे.


दरम्यान मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani Salary) हा निर्णय अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. त्याचसोबत मुकेश अंबानी यांनी एक आदर्शही ठेवला आहे. 


 


संबंधित बातमी :  मुकेश अंबानींच्या ड्राईव्हरची सॅलरी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल