मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एनर्जी सेक्टरपासून टेलिकॉम सेक्टरपर्यंत रिलायन्सनं गुंतवणूक केली आहे. एकीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचा पेट्रो क्षेत्रातला कारभार यशस्वी होत आहे. तर जिओही आता मोठी उडी मारण्याच्या तयारीत आहे. यामुळे मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज आता १०० अरब डॉलरची कंपनी बनली आहे. पुढच्या ७ वर्षांमध्ये आपण आपली वाढ दुप्पट करू असा दावा मुकेश अंबानींनी केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचं मुल्यांकन शेअर बाजारात पुन्हा १०० अरब डॉलरवर पोहोचलं आहे. कंपनीच्या शेअरचा भाव १,०९१ रुपये प्रति शेअर आहे. हा भाव ५२ आठवड्यांमधला उच्चांकी आहे.


३२ हजार कोटींची कमाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजार उघडला तेव्हा कंपनीचा शेअर १,०४३.१५ रुपयांवर उघडला आणि नंतर यामध्ये ५.२७ टक्के वाढ पाहायला मिळाली. सकाळी जवळपास ११ वाजून ५५ मिनिटांवर कंपनीचं बाजार मूल्य ६.८९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं. पण बाजार बंद होताना ६.८५ लाख कोटी म्हणजेच ९९.९२ अरब डॉलर एवढं मुल्यांकन झालं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर कंपनीचा शेअर १,०४४.३५ रुपयांवर उघडला होता. इकडेही शेअर ५.०२ टक्क्यांनी वाढला. यामुळे रिलायन्सच्या गुंतवणुकदारांची संपत्ती काही तासांमध्ये तब्बल ३२ हजार कोटी रुपयांनी वाढली.


टीसीएसनंतर दुसरी मोठी कंपनी


मागच्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजचा मुल्यांकन ऑक्टोबर २००७ मध्ये १०० अरब डॉलर पोहोचलं होतं. ११ वर्षानंतर कंपनीनं पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. १०० अरब डॉलर मुल्यांकन असणारी रिलायन्स ही टीसीएसनंतर देशातली दुसरी कंपनी बनली आहे. टीसीएस ही देशातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. टीसीएसचं मुल्यांकन ७.५५ लाख रुपये आहे.


एजीएमनंतर वाढला रिलायन्सचा शेअर


रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४१ व्या एजीएमनंतर शेअर १२.५ टक्क्यांनी वाढला आहे. एजीएमच्या दिवशी शेअर ९६५ रुपये होता. तर १२ जुलैला याच शेअरची किंमत १०८६ रुपये झाली.