Mukesh Ambani and Family : आशिया खंडातील, जगातील आणि भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये विराजमान असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं. व्यवसाय क्षेत्रात या कुटुंबानं आणि त्यातील प्रत्येक सदस्यानं दिलेलं योगदान उल्लेखनीय आहे. अशा या कुटुंबामध्ये फक्त मुलांनीच उच्चशिक्षण (Education) घेत स्वत:ला समृद्घ केलेलं नाही, तर या कुटुंबातील सूनांनीसुद्धा उच्चशिक्षण घेत आपआपल्या क्षेत्रात प्रगतीच्या वाटांवर चालण्याचा निर्णय घेतला. चला तर मग पाहुया अंबानी कुटुंबातील सूना शिकल्यात तरी किती... 


नीता अंबानी यांचं शिक्षण... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश अंबानी यांच्या पत्नी, नीता अंबानी (Nita Ambani) यांनी मुंबईतील नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स एँड इकोनॉमिक्समधून वाणिज्य (Commerce) शाखेतील पदवी घेतली. त्यांनी (Bharatnatyam dance form) भरतनाट्यम या नृत्यप्रकाराविषयीसुद्धा शिक्षण घेतलं. मुकेश अंबानी यांच्याशी लग्नगाठ बांधण्यापूर्वी नीता एका शाळेत शिक्षिका होत्या. 



टीना अंबानी यांचं शिक्षण किती? (tina ambani)


मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ, अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानींनी मुंबईतील एमएम प्‍यूपिल्‍स स्‍कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. मुंबईतील जय हिंद महाविद्यालयातून त्यांनी कला (Arts) शाखेतून पदवी शिक्षण घेतलं. 1975 मध्ये त्या फेमिना टीन प्रिंसेस ऑफ इंडिया हा किताब पटकावण्यात यशस्वी ठरल्या होत्या. 


हेसुद्धा वाचा : श्रीमंती, प्रसिद्धी असूनही नीता अंबानींपुढे दु:खाचा डोंगर; एका आशेच्या किरणानं आयुष्याला कलाटणी



आकाश अंबानीची पत्नी, श्लोका किती शिकलीये? 


(Akash Ambani wife) आकाश अंबानीची पत्नी, श्लोका मेहता (Shloka mehta) हिनं शालेय शिक्षण अंबानी कुटुंबाच्याच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. पुढे अमेरिकेला जाऊन तिनं उच्चशिक्षण पूर्ण केलं. तिथे असणाऱ्या प्रिंस्टन यूनिवर्सिटीतून तिनं अँथ्रोपोलॉजीचं शिक्षण घेतलं. यानंतर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पॉलिटिकल सायन्सची पदवी घेतली. श्लोकाकडे वकिलीचीही पदवी आहे. तिनं या विभागातून मास्टर्स पदवी घेतली आहे. 



होणाऱ्या सुनेचं, राधिका मर्चंटचं शिक्षण किती? 


मुकेश अंबानी यांची होणारी सून, म्हणजेच राधिका मर्चंटनं (Radhika Merchant) कॅथेड्रल एंड जॉन केनन अँड इकोल मोंडिएल वर्ल्‍ड स्‍कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तर, न्यूयॉर्क यूनिवर्सिटीतून तिनं पॉलिटिक्स आणि इकनॉमिक्सची पदवी घेतली आहे.



सध्याच्या घडीला ती, ADF फूड्स लिमिटेड आणि एन्कोर हेल्थकेयर प्राइवेट लिमिटेडची जबाबदारी सांभाळत आहे.