मुंबई : शेअर बाजार म्हटला तर जोखीम ही आलीच, हात लावताच मातीचंही सोनं होतं किंवा सोन्याचीही माती होऊ शकते. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक खुपच सावधानतेने करायला हवी. अनेक स्टॉक असे आहेत की, ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. असाच एक स्टॉक म्हणजेच GRM Overseas होय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्मॉल-कॅप राइस मिलिंग कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या एका वर्षात 34 रुपयांवरून 782.40 रुपयांपर्यंत वाढली आहे. या एका वर्षाच्या कालावधीत या शेअरने आपल्या भागधारकांना 2,171.78 टक्के परतावा दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 23 लाख रुपये मिळाले असते.


GRM ओव्हरसीज शेअरचा इतिहास
10 वर्षांत, GRM ओव्हरसीजचा शेअर 1.93 वरून 782.40 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या भागधारकांना सुमारे 40,450 टक्के परतावा दिला आहे. 


गेल्या 5 वर्षांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 4.49 रुपयांवरून 782.40 रुपयांपर्यंत वाढला आहे. 


या 5 वर्षांच्या कालावधीत हा शेअर सुमारे 17,325 टक्क्यांनी वाढला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला हा शेअर 856 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता.


गेल्या 6 महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक 156 रुपयांवरून 782 च्या पातळीवर गेला आहे. या कालावधीत GRM ओव्हरसीजच्या स्टॉकची किंमत 400 टक्क्यांनी वाढली आहे. 


गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 15 डिसेंबर रोजी तो 504 रुपयांवर होता, जो 277 रुपयांच्या वाढीसह 782 वर व्यवहार करत आहे.


गुंतवणूकदारांना किती नफा झाला ?


जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 5 लाख झाले असते. 


एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी हा स्टॉक 1.93 च्या पातळीवर विकत घेतला असेल आणि त्यात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर तो आज 4.05 कोटी रुपयांचा मालक झाला असता.