मुंबई : Multibagger Penny Stocks:रशिया-युक्रेन युद्धादरम्यान शेअर बाजाराची चाल बिघडली आहे. परंतू तरीही गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अवघ्या 6 महिन्यांत पैसे दुप्पट करणाऱ्या आणि अवघ्या एका वर्षात मल्टीबॅगर ठरलेल्या ड्युकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीजने (Ducon Infratechnologies) आपल्या भागधारकांना 'बोनस शेअर्स' देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, कंपनी 1:10 च्या गुणोत्तरानुसार बोनस देईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीची बैठक झाली. ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या कंपनीच्या स्टॉकने गेल्या एका वर्षात 260 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. इतकेच नाही तर या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या 6 महिन्यांतच 104% चा बंपर परतावा दिला आहे.


कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय 


ड्युकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या अंतर्गत कंपनीच्या अधिकृत भागभांडवलात वाढ करण्यात आली आहे.


या बैठकीत कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनच्या भांडवली कलमातील बदलासही मान्यता देण्यात आली आहे. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्येही याबाबत माहिती दिली आहे.


जाणून घ्या काय आहे 'बोनस शेअर्स'


कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. बोनस शेअर्स म्हणजे कंपनी आपले शेअर्स अनेक भागात विभागते. यामुळे शेअरची किंमत कमी होते जेणेकरून अधिक लोक ते खरेदी करू शकतील.


आता कंपनीच्या सर्व भागधारकांना हे बोनस शेअर्स मिळतील. ज्याच्याकडे कंपनीचा 1 शेअर आहे. विभागल्यानंतर त्याच्याकडे 10 शेअर होतील. पण, शेअर्सची किंमतही त्याच प्रमाणात कमी होईल.