श्रीमंती कोणती मोठी..मनाची की सोन्याची? पत्नी ऑक्सिजनवर तरी देखील सोने विकून इतरांना ``फ्री ऑक्सिजन``
सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीमुळे प्रभावित आहे. देशातील बर्याच भागांमध्ये, वैद्यकीय ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत.
मुंबई : सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीमुळे प्रभावित आहे. देशातील बर्याच भागांमध्ये, वैद्यकीय ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. ऐवढेच काय ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. अशा काळात बरेच लोक मानवतेचे उदाहरण सामोर ठेवत एकमेकांना मदत करत आहेत. असेच एक मानवतेचे उदाहारण समोर ठेवलं आहे ते, मंडप डेकोरेटर पास्कल सल्धाना यांनी.
ते आपल्या पत्नीच्या विनंतीमुळे लोकांना विनामूल्य ऑक्सिजन देत आहे. त्यांना असे दिसून आले की, लोकांना ऑक्सिजनसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या आहेत. तर वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत पास्कल सल्धाना लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
पास्कल 18 एप्रिलपासून लोकांना मदत करत आहे. ते तेव्हापासून लोकांना विनामूल्य ऑक्सिजन पुरवत आहेत. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, "माझ्या पत्नीच्या विनंतीवरून मी तिचे दागिने विकले. त्यातून आम्हाला 80 हजार रुपये मिळाले. त्यानंतर मी लोकांना विनामूल्य ऑक्सिजन देणे सुरू केले." त्यांनी असेही सांगितले की, कधीकधी लोक त्यांना इतरांना मदत करण्यासाठी पैसे देखील देतात.
पास्कल म्हणाले, "माझी पत्नी डायलिसिस आणि ऑक्सिजनच्या आधारावर आहे. आमच्याकडे नेहमीच अतिरिक्त सिलिंडर असतो. एके दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिकेनी त्यांच्या पतीसाठी ऑक्सिजन मागितले. माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून मी त्यांना ते दिले." पास्कल यांच्या पत्नीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर त्या गेल्या 5 वर्षांपासून डायलिसिसवर आहे.
पास्कल यांच्या या कार्यामुळे लोकांना प्रेरणा मिळाली आहे. लोकं सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक करत आहेत. पास्कल सारखे लोकं स्वत:चं दु:ख विसरुन दुसऱ्याच्या सुखासाठी झटतात आणि त्यांनी हे खरोखरचं माणुसकीचं जिवंत उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे. त्यांच्या या कार्याला सलाम असो.