नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्धात मुस्लिम रेजिमेंटनं धोकेबाजी केली होती... त्यामुळे त्यानंतर सेनेतून मुस्लिम रेजिमेंट संपुष्टात आणली गेली, असा दावा सोशल मीडियावर केला जातोय... पण, या वायरल पोस्ट मागचं सत्य काय आहे... जाणून घेऊयात...


मुस्लिम रेजिमेंट अस्तित्वात असल्याचा दावा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय सेनेत मुस्लिम रेजिमेंट नाही असा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय... भारतीय सेनेत मराठा रेजिमेंट, शीख रेजिमेंट, पुंजाब रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, जाट रेजिमेंट आहेत... पण, भारतीय सेनेत मुस्लिम रेजिमेंट का नाही? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.


१९६५ पर्यंत भारत-पाकिस्तानच्या पहिल्या युद्धात या युद्ध लढण्यास नकार दिला. २० हजार मुस्लिम सेनेच्या जवानांनी आपले हत्यार टाकले... त्यानंतर या रेजिमेंटवर बॅन आणण्यात आला... असा दावाही यात केला गेलाय.


'परमवीरचक्र' अब्दुल हमीद


खरं म्हणजे, १९६५ युद्धात अब्दुल हमीद हिरो ठरले... पाकिस्तानच्या टँक ब्रिगेडला धूळ चारायला लावणाऱ्या अब्दुल हमीद यांना त्यांच्या शौर्यासाठी मरणोप्रांत परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला होता.


वायरल व्हिडिओमागचं सत्य...


ब्रिटिश काळात 'ब्रिटिश इंडियन आर्मी' अस्तित्वात होती... आपल्या सोईसाठी आर्मी टीम्सची नावं जात आणि धर्म विभागली गेली होती. स्वातंत्र्यानंतर आणि फाळणीनंतर इंडियन आर्मी दोन भागांत विभागला गेली... ब्रिटिश काळात मुस्लिम रेजिमेंट अस्तित्वात होती. परंतु, स्वातंत्र्यानंतर धर्माच्या - जातीच्या नावावर कोणतीही रेजिमेंट अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळे, भारतात 'मुस्लिम रेजिमेंट' अस्तित्वात नाही. 


त्यामुळे, भारतीय सेनेत मुस्लिम रेजिमेंट देशद्रोहाच्या कारणामुळे अस्तित्वात नसल्याचा दावा साफ खोटा आहे. हा व्हिडिओ केवळ लोकांची दिशाभूल करणारा आहे, असं भारतीय सेनेतील सूत्रांचं म्हणणं आहे.


'हिंदूस्तान मुसलमान कंपनी'


१९६५ भारत - पाकिस्तान युद्धात परमीवरचक्र प्राप्त करणारे अब्दुल हमीद ग्रेनेडियर रेजिमेंटच्या 'हिंदूस्तान मुसलमान कंपनी'चा भाग होते... 'हिंदूस्तान मुसलमान कंपनी' ही आजही भारतीय ग्रेनेडियर रेजिमेंटचा भाग आहे. यात केवळ मुस्लिम तरुणांची भरती केली जाते.