मुस्लिमांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करू नयेत, `देवबंद`चा नवा फतवा
इस्लामिक संस्था `दारुम उलूम देवबंद`नं एक नवा फतवा जाहीर केलाय. मुस्लीम स्त्रिया आणि पुरुषांनी सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करू नयेत... हे धर्माच्या विरुद्ध आहे, असा फतवाच त्यांनी काढलाय.
सरहानपूर : इस्लामिक संस्था 'दारुम उलूम देवबंद'नं एक नवा फतवा जाहीर केलाय. मुस्लीम स्त्रिया आणि पुरुषांनी सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करू नयेत... हे धर्माच्या विरुद्ध आहे, असा फतवाच त्यांनी काढलाय.
याविषयी एका व्यक्तीनं दारुम उलूम देवबंदला प्रश्न विचारला होता. फेसबुक, व्हॉटसअप आणि इतर सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करणं योग्य आहे का? असा प्रश्न केला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून देवबंदनं हा फतवा जाहीर केलाय.
मुस्लिम महिला आणि पुरुषांनी स्वत:चा किंवा आपल्या कुटुंबियांचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करणं योग्य नाही... कारण इस्लाम यासाठी परवानगी देत नाही, असं 'देवबंद'नं म्हटलंय.
इस्लाममध्ये गरजेशिवाय पुरुष आणि महिलांना फोटो काढण्याचीही परवानगी नाही, तर सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं कसं योग्य असेल? असा सवाल मुफ्ती तारिक कासमी यांनी विचारलाय.