मुंबई : म्युच्युअल फंड्सच्या अनेक अशा स्किम आहेत ज्यांनी आपल्या लॉंचिंगनंतर गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न्स दिले आहेत. यातच एक स्किम म्हणजे ICICI Prudential Value Discovery Fund होय.  या फंडमध्ये गुंतवणूकदारांना मागील वर्षात चांगला रिटर्न मिळाला आहे. वॅल्यु कॅटेगरीमध्ये ही सर्वात मोठी स्किम बनली आहे. जुलै 2021 पर्यंत एकूण एसेट  बेस 21 हजार 195 कोटी रुपये होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ICICI Prudential Value Discovery Fund ने 17 वर्षांचा प्रवास केला आहे. हा फंड 16 ऑगस्ट 2004 रोजी लॉंच झाला होता. जर गुंतवणूकदारांनी त्यावेळी या फंडमध्ये एकाचवेळी 1 लाख रुपये गुंतवले असतील. तर 31 जुलै  2021 पर्यंत या गुंतवणूकीची वॅल्यु 22.13 लाख रुपये झाली असेल. या स्किमचा CAGR 20.03 टक्के राहिला आहे.


Nifty 50 TRI पेक्षा जास्त रिटर्न


जर या अवधीतील Nifty 50 TRIचा CAGR पाहिला तर 15.91 टक्के राहिला आहे. म्हणजेच 1 लाख गुंतवणूकीची वॅल्यु 12.24 लाख झाली असती.  ही स्किम डायवर्सिफाइड स्टॉक्सच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करते. त्यामुळे चांगल्या वॅल्युच्या शेअरमध्ये लॉंग टर्मची गुंतवणूक फंडसाठी फायद्याची ठरत आहे.