Alaska Triangle Mystery : अमेरिकेची स्पेस एजन्सी म्हणजे नासाने (NASA) अनेकदा रहस्यमय जागांबाबत तसेच एलियन सारख्या घटनांमध्ये रस दाखवला आहे. काही दिवसांपूर्वी एलियनचं एका फोटो समोर आला होता. तर गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे स्पेसबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असंच एक ठिकाण म्हणजे 'अलास्का ट्रँगल'... अलास्का ट्रँगलबाबतच्या घडामोडी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मात्र, तुम्हाला माहितीये का? इथं 1970 पासून 20,000 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळजवळ 1970 पासून दक्षिणेकडील अँकोरेज आणि जुनेउपासून उत्तर किनार्‍यावरील उत्कियागविकपर्यंतच्या भागात 20,000 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. त्याशिवाय याशिवाय येथे मोठ्या पावलांचे ठसेही आढळून आले. बचाव कर्मचार्‍यांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत असताना चक्कर येणं आणि दिशाहीन झाल्यासारखं तसेच भुताटकीचे आवाज ऐकल्याचे सांगितलं, त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.


हिप्नोथेरपिस्ट संशोधक जॉनी एनोक यांनी सांगितलं की, 'अलास्का ट्रँगल'मध्ये काहीतरी विचित्र घडत आहे. त्यांचा अंदाज आहे की अमेरिकन सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या रहस्यामागील गोष्टीची गुप्तपणे माहिती आहे. मात्र, त्यांनी याची माहिती उघड केली नाही.


डिस्कव्हरी चॅनल डॉक्युमेंटरीचा हवाला देत मिरर यूकेने अहवाल जाहीर केला होता. यामध्ये यूएफओ पाहणारा प्रत्यक्षदर्शी वेस स्मिथ याची मुलाखत व्हायरल झाली होती. एक अतिशय वेगळी त्रिकोणी आकाराची मजबूत वस्तू होती. आम्हाला माहित असलेल्या विमानापेक्षा ते वेगळ्या पद्धतीने उडत होते, असं स्मिथ म्हणतो. त्या वस्तूचा आवाज येत नव्हता, असंही तो म्हणतो. त्याचबरोबर स्मिथपासून 11 किमी लांब असलेला मायकेलने देखील अजब दृष्य पाहिलं.\


आणखी वाचा - प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर का सोडू शकला नाही देश आणि इस्त्रोची छाप?


मायकेल डिलन म्हणतो की, त्याने अशीच एक घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. ज्यामध्ये उच्च वेगाने वर जाण्यापूर्वी ढगांमध्ये एक प्रकाश दिसला. आम्ही जे पाहिलं ती नैसर्गिक घटना नव्हती हे स्पष्ट होतं. त्या वेगानं मानवी शरीर काहीही उडू शकत नाही, असं मत मायकलने मांडलं आहे.