Viral Video -  साप म्हटलं की लोकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र नागपंचमीच्या (Nag Panchami 2022) दिवशी या नागाची पूजा केली जाते. आज नागपंचमी आहे अशात नाग-नागिणीचा एक मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला यूजर्स वारंवार बघत आहेत. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर नाग-नागिणीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 



नाग-नागिणींचं अनोखं रुप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नाग आणि नागिणीची जोडी एकमेकांना आलिंगन घेत आहेत. हे अगदी रोमांचक दृष्य क्वचितच तुम्ही पाहिलं असेल. एका शेतात नाग-नागिणींचा रोमान्स पाहिला मिळतो आहे. व्हिडीओमधील नाग-नागिण जवळपास 8 फूट लांबीचे आहेत असं दिसतं. या व्हिडीओमध्ये नाग आणि नागिणीचं एक अनोख प्रेम पाहिला मिळतं. महाराष्ट्रातील काही भागात या नाग-नागिणीच्या या दृष्याला फळण, जुळण असंही म्हटलं जातं.


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम शेअर करण्यात आला आहे.  'snake._.world' या नावाच्या अकाउंटवर हा व्हिडिओ पाहिला मिळतो. या व्हिडीओला आतापर्यंत असंख्य यूजर्सने वारंवार पाहिला आहे. तर 4 हजारापेक्षा जास्त यूजर्सने तो लाइक केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by SNAKE WORLD(@snake._.world)