Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023: सध्याच्या घडीला देशामध्ये निवडणुकांचं वातावरण पाहायला मिळत असून, सत्तापालट, विरोधकांचे आक्रमक पवित्रे आणि तत्सम गोष्टींच्या घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. नुकतीच देशाच्या पूर्वोत्तर भागात येणाऱ्या त्रिपुरा, मेघालय, नागालँड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियाही पार पडली आहे. असं होत असतानाच आता लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. एक्झिट पोलमधून समोर आलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला सत्तेवर असणाऱ्यांच्याच हाती सत्तेच्या चाव्या देण्यासाठी इथं विरोधकांविरोधातच मतदान झाल्याचं कळत आहे. 


हेसुद्धा वाचा : Sensex and Nifty Today: निफ्टी पुन्हा गडगडला; पाहा कुठले शेअर घसरले आणि कुठले वाढले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


सोमवारी मेघालय (Meghalay), नागालँड (Nagaland) येथे सुरु असणारी मतदान प्रक्रिया संपली आणि उत्सुकता लागून राहिली ती म्हणजे मतदार राजानं कुणाला कौल दिला याबाबतची. याआधीच म्हणजे 16 फेब्रुवारीला त्रिपुरातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. ज्यानंतर आता एक्झिट पोलमधील माहिती नजरा वळवत आहे. 


मेघालयात काय स्थिती? 


मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीला सर्वाधिक मतं मिळण्याचा अंदाज आहे. इथं पक्षाचा 60 पैकी 18 ते 24 जागांवर विजय होऊ शकतो. तर, भाजपला इथं फक्त 4 ते 8 जागा मिळू शकतात. काँग्रेस तुलनेनं जास्त म्हणजेच 6 ते 12 जागांवर विजयी होऊ शकतं. तृणमूल 9 तर, इतक पक्षांना मेघालयमध्ये 17 ते 29 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे. हे आकडे तंतोतंत असल्यास इथं पुन्हा एकदा एनपीपीचं सरकार असेल. 


नागालँडमध्ये कोण जिंकणार? 


नागालँडमध्ये 38 ते 48 जागांसह एनडीपीपी - भाजप युती विधानसभा निवडणूक गाजवताना दिसणार आहे. चक. एनरीएफला इथं 3 ते 8 जागांवर विजय मिळवता येईल. एलजेपी, एनसीपी, आरपीआय (ए) यांसारख्या इतर पक्षांना इथं 15 जागांवर समाधान मानावं लागेल. 


त्रिपुरामध्ये कोण बाजी मारणार? 


माय इंडिया एक्झिट पोलसह इतर माध्यम संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार प्रचंड मतांनी विजयी होत त्रिपुरामध्ये भाजप बाजी मारू शकतं. इथं पक्षाला 36 ते 45 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, टिपरा मोथरा इथं 9 ते 16 जागा जिंकू शकतो. इथं तब्बल 45 टक्के मतं भाजपच्या पारड्यात जाणार आहेत अशा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, वाम- काँग्रेस आणि टिपरा मोथरा यांच्या वाट्याला अनुक्रमे 32 ते 20 टक्के मतं जातील.