मुंबई : नागिन डान्स (Nagina Dance) शिवाय भारतीय लग्न (Indian Wedding) होणं जरा कठीणच आहे. नवरदेवाचा भाऊ किंवा मित्र कुणी ना कुणी लग्नात नागिन डान्स (Nagina Dance) करत असतात. मात्र सोशल मीडियावर नागिन डान्सचा वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या वेडिंग व्हिडिओ (Wedding Video) मध्ये नवरदेवच चक्क आपल्या स्टेजवर नागिन डान्स करताना दिसला. 


नववधु-नवरदेवाच्या समोर स्टेजवर लोळला मित्र 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वेडिंग व्हिडिओत (Wedding Video) नववधु आणि नवरदेव स्टेजवर बसले आहेत. त्याचा मित्र स्टेजवर अक्षरशः लोळला आहे. तो मुलगा झोपल्या झोपल्या अचानक नागिन डान्स करायला लागला. त्याला असं डान्स करताना बघून नवदेवाला देखील आपल्या भावना आवरल्या नाहीत. त्याने बीन वाजवायला सुरूवात केली. हे बघून नववधुला खूप विचित्र वाटलं. 



नवरदेवाला दिली अशी साथ व्हिडीओमध्ये देखील हा मुलगा नवरदेवासोबत नागिर डान्स करत होता. सुरूवातीला नवरदेवाने मजा घेतली. तो देखील बसल्या बसल्या डान्स करत होता.


सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी मुलगी सुरुवातील तोंड वाकड करत कशीबशी नवरमाला नवरदेवाच्या गळ्यात टाकते. ही वरमाला घालताना ती खूश नसते. तर नवरदेवही वरमाला टाकल्यासारखी तिच्या गळ्यात फेकून देतो. हा व्हिडीओ पाहताना दोनच गोष्टी वाटतात एकतर हे लग्न करणं दोघांच्याही जीवावर आलं असावं किंवा एकमेकांचा राग एकमेकांवर अशा पद्धतीनं काढत असावेत. नववधूने वरमाला घालताना जे केलं त्यामुळे काहीसा नाराज आणि रागवलेला नवरदेव जे करतो ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.