Nagpanchami Naag Birthday Celebration: नागपंचमीनिमित्त घरोघरी नागाची मनोभावे पूजा केली जाते. हिंदू धर्मात नाग देवतेचा संबंध देवी-देवतांशी जोडला गेला आहे. पण सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. कारण काही जणांनी या दिवसाचं औचित्य साधत नागाचं बर्थडे सेलिब्रेशन केल्याचं दिसत आहे. या व्हिडीओत काही मुलं टाळ्या वाजवून नागाचा बर्थडे सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे, हे मात्र कळू शकलेलं नाही. पण नागपंचमी पाहता व्हिडीओ व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या एक नाग फणा काढून उभा असल्याचं दिसत आहे. त्याच्याभोवती मुलांनी रिंगण केलं आहे. तसेच हॅप्पी बर्डथे टू यू नागोबा...भाई का बर्थ असं बोलत पार्टी मागत आहेत. खाली दिलेला व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. काही जणांनी या व्हिडीओ संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सापासोबत असं करू नका असा सल्ला काही जणांनी दिला आहे. तर काही जणांनी हसण्याचे इमोजी शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.