नागपूर : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचाणाऱ्या पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात रविवारी घडली. गिट्टीखदान येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयापासून काही अंतरावर ही घटना घडली, ज्यानंतर या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते. नारायण प्रसाद द्विवेदी असं मृत व्यक्तीचे नाव आहे आणि बलराज पांडे असे आरोपीचे नाव आहे. हत्या करणारा 20 वर्षीय तरुण मृतकच्या जुन्या घर मालकाच्या मुलगा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी या प्रकरणी मारेकरी बलराम पांडेला अटक केली आहे. बलराम पांडे याचे मयत नारायण द्विवेदी यांच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. तो सतत द्विवेदी यांच्या मुलीचे पाठलाग करायचा, छेड काढायचा. याबाबत द्विवेदी यांनी बलरामला समजावले होते. तसेच बलरामच्या वडिलांकडे तक्रार केली होती. त्यानंतर बलरामच्या वर्तनात कोणती सुधारणा झाली नाही. त्यामुळे द्विवेदी यांनी पांडे यांचे भाड्याचे घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते घर सोडलं.


ते घर सोडून द्विवेदी कुटुंब दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले होते. दरम्यान द्विवेदी कुटुंब घर रिकामे करून दुसरीकडे जाऊ नये असे प्रयत्न आरोपी बलरामने सुरु केले होते. त्यावरून बलराम पांडे आणि नारायण द्विवेदी यांच्यात वादही झाला होता. त्यानंतर द्विवेदी कुटुंबीयांनी घर बदलवले. दुसरीकडे राहायला गेल्यावर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील त्यावेळी आरोपी बलरामने नारायण द्विवेदी यांना दिली होती.


मात्र, नारायण द्विवेदी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपलं घर बदललं. परंतु हा राग डोक्यात घेऊन ओरोपी बलरामने एक वेगळाच प्लान आखला.


आरोपी बलराम पांडे

रविवारी सकाळी नारायण द्विवेदी आपल्या कामावर जाण्यासाठी दुचाकीने घरातून निघाले. तेव्हापासून बलराम त्यांचा पाठलाग करत होता. ते गिट्टीखदान परिसरात गुन्हे शाखेच्या जवळून जात असताना बलरामने त्यांना अडविले आणि त्यांच्यासोबत वाद उकरून काढत प्राणघातक हल्ला केला.


आरोपीने चाकूने नारायण द्विवेदी यांच्यावर अनेक वार केल्याने ते दुचाकीसह रस्त्यावरच कोसळले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याला गोरेवाडा परिसरातून अटक केली आहे.