नवी दिल्ली : माजी खासदार नाना पटोले यांनी पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. राहुल गांधींनी त्यांचं काँग्रेसमध्ये स्वागत केलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम देखील उपस्थित होते. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत नाना पटोलेंनी भाजप खासदारकीचा राजीनामा दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING