कोलकाता : पश्चिम बंगालमधील मैनागुडीमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकस्त्र सोडले. शारदा चिटफंड गैरव्यवहारातील आरोपांची ममता बॅनर्जी पाठराखण का करत आहेत, असा सवाल करतानाच जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्यांना चौकीदार अजिबात सोडणार नाही, असा इशारा मोदी यांनी यावेळी दिला.लुटारुंसाठी दीदीने धरणे आंदोलन केले. दीदीला दिल्लीत जाण्यासाठी त्रागा करत आहे. कारण बंगालमधील गरिब आणि मध्यम वर्गातील लोकांना लुटण्यासाठी महाआघाडी करत आहे. पश्चिम बंगालचे सरकार देशात घुसखोरी करण्याचे स्वागत करत आहे. मात्र, देशातील सर्वात मोठा पक्ष भाजपला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारमुळे आज विकास होत आहे. विकासाला गती मिळत आहे. तुम्ही साडेचार वर्षांपूर्वी एक मजबूत सरकारसाठी मतदान केले नसते तर भारत - बांग्लादेश सीमा प्रश्न तसाच कायम राहिला असता. तो कधीच सुटला नसता, असे मोदी म्हणालेत.



पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे. मात्र, दादागिरी अन्य कोणाची तरी चालत आहे. शासनाच्या सर्व योजनांच्या नावाखाली प्रशासकीय दलालांना मध्यस्थी दलालांना अधिकार आहेत. पश्चिम बंगाल सरकारने काहीही केले नाही. पश्चिम बंगाल आपल्या कला आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. आज हे राज्य स्वायत्त आणि हिंसाचाराच्या पद्धतींसाठी ओळखले जात आहे, असे मोदी म्हणालेत.