नवी दिल्ली : तेलुगु देसम पार्टी आणि काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे, संसदेत यावर सध्या चर्चा सुरू आहे, यानंतर त्यावर मतदान होणार आहे, मोदी सरकारसाठी ही अग्निपरीक्षा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र ही चर्चा सुरू असताना बीजू जनता दलच्या सदस्याने संसदेतून वॉक आऊट केलं, या दरम्यान बीजेडी म्हणजेच बीजू जनता दलच्या सदस्यांनी हे स्पष्ट केलं आहे की, ते न भाजपा सोबत आहेत, ना काँग्रेससोबत. शिवसेनेने देखील अशीच भूमिका घेतली आहे. ते ना काँग्रेससोबत किंवा टीडीपी सोबत आहेत, ना भाजपासोबत, पण याचा फायदा मतदानाच्या वेळी भाजपला होणार आहे हे नक्की आहे.


मोदी त्यांच्याकडे पाहून मिश्किल हसले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना, बीजेडी आणि टीआरएसने (तेलंगाना राष्ट्र समिती)ने देखील अविश्वास प्रस्तावावर कुणाच्याही बाजूने मतदान करण्यास नकार दिला. संसदेचं कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झालं, आणि बीजेडीच्या सदस्यांनी सदनातून वॉकआऊट करत, संसदेतून काढता पाय घेतला, याच वेळी बीजेडीच्या सदस्यांनी मागे वळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिलं, आणि पीएम नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर उत्साह आला, आणि ते बीजेडीच्या सदस्यांकडे पाहत, छानपैकी हसले.



त्या मिश्किल हसण्यामागचं गणित


कारण बीजेडीने वॉकआऊट केल्याने, आता संसदेत बहुमतासाठीचा आकडा कमी होऊन 258 वर आला आहे. सदनात भाजपाजवळ २७३ सदस्य आहेत. शिवसेनेने देखील मतदानास उपस्थित न राहता, तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे, त्याचा देखील भाजपला मोठा फायदा होणार आहे.


जे बीजेडीला जमलं ते शिवसेनेला जमेल का?


या प्रस्तावाला विरोध करताना बीजेडीने सांगितलं, या अविश्वास प्रस्तावावर आणि यावर होणाऱ्या चर्चेतून ओडिशाच्या लोकांचा कोणताही फायदा होणार नाहीय. संसदेत चर्चा सुरू होण्याआधी बीजेडीने संसदेचे नेते भातृहरि मेहताब यांनी म्हटलंय, मागील १४ वर्षात ओडिशासोबत अन्याय झाला आहे. १० वर्ष यूपीएचे असू द्यात, नाही तर ४ वर्ष एनडीए सरकारचे, ही चर्चा आमच्यासाठी अर्थहीन आहे. यानंतर बीजेडीच्या सदस्यांनी संसदेतून वॉकआऊट केलं.