नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ यात्रा सुरु केली. मात्र, या यात्रेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मीडियाकडून याला मोठे कव्हरेज मिळाली. मोदी रुद्राभिषेक करत गुहेत ध्यानधारणा केली. केदारनाथपाठोपाठ बद्रीनाथाच्या चरणीही पंतप्रधानांनी डोके टेकले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा आहे, असा थेट आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रार नोंदवली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी केदारनाथ यात्रेवर आहेत. मात्र या यात्रेला मीडियाकडून मोठ्या प्रमाणात कव्हरेज मिळत आहे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये नऊ लोकसभा जागांवर शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण लागले होते. हिंसाचार झाल्यामुळे निवडणूक आयोगाकडून बंगालमधील प्रचार एकदिवस आधी संपविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मोदी आणि शाह यांच्या सभा होण्याबाबत पुरेपूर काळजी निवडणूक आयोगाने घेतली, असा आरोप करण्यात येत आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत हिंसा केल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, त्यानंतर एक व्हिडिओ समाजमाध्यमांतमध्ये व्हायरल झाला. यात भाजपकडून हिंसा घडवून आणल्याचे दिसून येत आहे. 



मोदी शनिवारी सकाळी उत्तराखंडला गेले. त्यानंतर तिथून ते केदारनाथाच्या चरणी लीन झालेत. मोदींचा गेल्या पाच वर्षांमधला हा चौथा केदारनाथ दौरा आहे. मोदींनी मंत्रोच्चरात विशेष पूजा केली. त्यानंतर पंतप्रधानांनी ध्यान केले. यावेळी मोदींनी खास गढवाली वस्रे परिधान केली होती. शिवशंकराच्या मंदिरात पूजा केली. त्यानंतर नरेंद्र केदारनाथ परिसरात सुरू असलेल्या विकासकार्यांचाही आढावा घेतला. त्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्रीनाथाच्या दर्शनासाठी पोहचलेत.