मुंबई : 2020 साली फक्त भरतावर नाही तर संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट होतं. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने होत्याचं नव्हतं केलं. कोरोना या अदृश्य व्हायरसमुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. अनेक बालक अनाथ झाली. अशा परिस्थितीत कोरोनामळे नाही अनेकांनी अत्महत्या केल्याने मृत्यू झाला. अशात एक लक्षात आलं की, व्यक्तीने फक्त शारीरिक नाही मानसिक दृष्ट्या देखील मजबूत राहायला हवं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनापेक्षा आत्महत्येमुळे मृत्यू जास्त
गेल्या वर्षी भारतात कोरोनामुळे नाही तर आत्महत्यांपेक्षा जास्त मृत्यू झाले. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नवीन आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतात 1 लाख 53 हजार लोकांनी आत्महत्या केल्या, तर 2020 मध्ये कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 49 हजार होती. गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी भारतातील आत्महत्या केलेल्या व्यक्तीची संख्या सर्वाधिक आहे.


कामगारांची सर्वाधिक  आत्महत्या 
कोरोना काळात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या कामगारांची होती. लॉकडाऊनमुळे ज्यांचे जनजीवन सर्वात जास्त प्रभावित झाले. गेल्या वर्षी 37 हजार 666 मजुरांनी आत्महत्या केल्या होत्या.  याशिवाय ज्यांना आधीच काही गंभीर आजार होता, अशा लोकांची संख्या 27 हजारांहून अधिक होती.


महिलांपेक्षा पुरुषांची अधिक आत्महत्या
आत्महत्या करणार्‍यांमध्ये 71 टक्के पुरुष होते.  याचा अर्थ गेल्यावर्षी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरूषांचे प्रमाण अधिक होते. परंतु आत्महत्या केलेल्या महिलांपैकी 50 टक्के महिला गृहिणी होत्या. शिवाय गेल्या वर्षी साडे बार हजार विद्यार्थी आणि 10 हजार शेतकऱ्यांनी आत्यहत्या केली. 


बेरोजगारांपेक्षा अधिक व्यावसायिक किंवा नोकरी करणाऱ्यांची आत्महत्या 
कोरोना काळात बेरोजगारांची नाही व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आत्महत्या केली.  याशिवाय गेल्या वर्षी अनेक सेलिब्रिटींनीही आत्महत्या केली होती, ज्यामध्ये सर्वात मोठे नाव होते अभिनेता सुशांत सिंग राजपूत, याशिवाय गेल्या वर्षी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनीही आत्महत्या केली होती.