ED Seal Young Indian Office: नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज बुधवारी मोठी कारवाई केली. मनी लाँड्रिंग प्रकरणात तपासाचा भाग म्हणून केंद्रीय एजन्सीने दिल्लीतील हेराल्ड हाऊस सील केले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मुख्य कार्यालयात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश करता येणार नाही. याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून ईडीने हेराल्ड हाऊससह दिल्लीतील अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात केंद्रीय तपास संस्थेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली आहे. ईडीच्या कारवाईनंतर सोनिया आणि राहुल गांधी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


12 ठिकाणी छापे


नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रीय राजधानीत 12 ठिकाणे आणि इतर ठिकाणी छापे टाकल्यानंतर ही कारवाई झाली. या प्रकरणात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण आर्थिक अनियमिततेशी संबंधित असून सुमारे नऊ महिन्यांपूर्वी त्याची नोंद करण्यात आली होती.


27 जुलै रोजी तपास यंत्रणेने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची जवळपास तीन तास चौकशी केल्यानंतर काही दिवसांनी हे छापे टाकण्यात आले. याप्रकरणी ज्येष्ठ नेत्याच्या चौकशीची ही तिसरी फेरी होती. ईडीने सोनिया गांधींना समन्स बजावल्यानंतर, सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी देशभरात निदर्शने केली. ईडीने 26 जुलै रोजी सोनिया गांधी 


यांचीही चौकशी केली होती. मुलगी प्रियंका गांधी देखील त्यांच्या सोबत ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या. अधिका-यांनी सांगितले की त्या दिवशी पक्षाध्यक्षांना नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील त्यांच्या सहभागाबद्दल सुमारे 30 प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगण्यात आले.


राहुल गांधींची चौकशी


या प्रकरणी ईडीने राहुल गांधी यांची पाच दिवस चौकशी केली. ईडीने 13 जून ते 15 जून असे सलग तीन दिवस राहुल गांधी यांची 27 तासांपेक्षा जास्त चौकशी केली आणि 20 जूनला त्यांना पुन्हा समन्स बजावले. 20 जून रोजी त्यांची सुमारे 14 तास चौकशी करण्यात आली. 


काँग्रेस नेत्याला 13 जून रोजी पहिल्यांदा ईडीच्या तपासकर्त्यांसमोर हजर करण्यात आले होते. सुरुवातीला 16 जूनला हजर राहण्यापासून सूट मागितली होती, त्यानंतर 17 जूनला त्यांना बोलावण्यात आले.