काँग्रेसचाच पराभव होणार - नॅशनल हेरॉल्ड
काँग्रेसचं मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रानं आज मध्यप्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसचाच पराभव होईल असं भाकित छापलंय.
भोपाळ : काँग्रेसचं मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रानं आज मध्यप्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसचाच पराभव होईल असं भाकित छापलंय. वर्तमान पत्रानं छापलेल्या एका सर्वेक्षणानुसार मध्यप्रदेशात काँग्रेस आणि बसपाची आघाडी झाली नाही, तर त्याचा सरळ फायदा भाजपला होईल.
भाजपला एकूण १४७ जागा मिळतील असं या सर्वेक्षणाचं भाकित होईल. काँग्रेसला ७३ आणि बसपा १० जागा मिळतील असंही सर्वेक्षणात पुढे आलंय. बसपा आणि काँग्रेसची आघाडी झाली, तर मात्र भाजपचे १२६ आमदार निवडून येतील असंही सर्वेचं म्हणणं आहे. तर काँग्रेस आणि बसपाला एकत्र येऊनही १०३च जागा मिळतील असं नॅशनल हेरॉल्डनं छापलंय. त्यामुळे दोन्ही परिस्थितींमध्ये भाजपचाच विजय होईल असं चित्र आहे.