मुंबई : देशात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट पूर्णपणे संपत नाही, तोच तिसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या या लाटेचं सुरुवातीचं सौम्य रुप आता मागे पडलं आहे. दर दिवशी देशभरातून नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढताना दिसत आहे. परिणामी आरोग्य यंत्रणांवरचा तणाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांमध्ये देशात तब्बल 90 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. 


रुग्णसंख्या वाढीचा हा वेग पाहता येत्या काळात एक लाखांचा आकडा ओलांडल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत 90,928 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. 


यापैकी 19,206  रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, 325 रुग्णांचा या विषाणूच्या संसर्गामुळं मृत्यू झाला. सध्या देशात कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 6.43 टक्के असल्याचं कळत आहे. 


148 हून अधिक नागरिकांचं लसीकरण 
सध्या देशात 2,85,401 सक्रिय कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचाक सुरु आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 3,43,41,009 जणांना कोरोना होऊन गेला आहे. 


4,82,876 जणांना या कोरोनाच्या लाटांमध्ये जीव गमवावा लागलेला आहे. विषाणूचे नवे व्हॅरिएंट आणि त्यामुळं पसरणारा संसर्ग पाहता शासनानं लसीकरणाचा वेग वाढवला आहे. 


आतापर्यंत देशात 148.67 कोटी नागरिकांना लस देण्यास आली आहे. पण, देशात अद्यापही अशी मोठी संख्या आहे, ज्यांच्यापर्यंत पहिली लसही पोहोचू शकलेली नाही. 


परिणामी आता उर्वरित लोकसंख्येला लसीकरणाची सुविधा देत कोविडपासून सुरक्षित करण्यावर शासनाचा भर दिसत आहे. 


सध्याच्या घडीला देशात ओमायक्रॉन या व्हॅरिएंटचा संसर्ग झपाट्यानं होत असल्यामुळं आता नागरिकांनीही कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन यंत्रणेकडून करण्यात आलं आहे.