CNG-PNG Rate : सीएनजी-पीएनजी महागण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
नैसर्गिक वायूच्या (Natural Gas Rate) किमती 40 टक्क्यांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
Natural gas price hiked : सणासुदीच्या काळात (Festival Season 2022) सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. नैसर्गिक वायूच्या (Natural Gas Rate) किमती 40 टक्क्यांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. सोबतच कॉमन मॅनला आणखी एक झटका लागू शकतो. लवकरच सीएनजी-पीएनजीच्या (CNG-PNG Rate) दरात वाढ होण्याची शक्यता आहे. (natural gas price rises by 40 percent to record level cng and png can be expensive)
CNG-PNG महागणार?
1 ऑक्टोबरला किंमतींचा आढावा घेण्यात येणार आहे. या आढाव्यात नैसर्गिक वायूच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात. सरकार 6 महिन्यांनी दर ठरवते. दरवर्षी 1 एप्रिल आणि 1ऑक्टोबरला हा आढावा घेतला जातो. आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वीज बिल ते शेतीवर परिणाम
या वाढीमुळे घरापासून ते शेतीच्या वीजबिलावरही परिणाम होऊ शकतो. नैसर्गिक वायूचा वापर वीज आणि खतांच्या निर्मितीमध्ये देखील केला जातो.
देशातील मुख्य शहरातील इंधनाचे दर
मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये, डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
दिल्ली - पेट्रोल 96.72 प्रति लिटर, डिझेल 89.62 प्रति लिटर
चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर