Navjot siddhu: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपुर्वी नवज्योत सिद्धू यांनी कॅन्सरच्या उपचार पद्धतींसंदर्भात विधान केले होते. यानंतर वैद्यकीय क्षेत्रातून त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. आता नवज्योत सिंग सिद्धू यांना यांना 850 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.छत्तीसगड सिव्हिल सोसायटीने त्यांना ही नोटीस पाठवली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवज्योत यांची पत्नी नोनी यांना स्टेज 4 चा कॅन्सर झाला होता. त्या गेल्या दीड वर्षांपासून स्तनाच्या कर्करोगाशी दोनहात करत होत्या. या लढाईत त्यांना नवज्योत सिंग सिद्धू यांनी मोलाची साथ दिली. यावर नवज्योत आपले अनुभव सांगताना उपचार पद्धतींवर बोलले. माझी पत्नी आता कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्त झालीय. डॉक्टरांनी सांगितलं होतं, की तुमची पत्नी फार काळ राहणार नाही. त्यांची जगण्याची शक्यता 5% पण नाहीय. अशा स्थिती नैराश न होता मी आयुर्वैदातील डाएट फॉलो केला आणि 40 दिवसांमध्ये कॅन्सरवर मात केली, असे ते म्हणाले होते.  याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात त्यांनी त्यांच्या पत्नीचा डाएट सांगितला आहे. सिद्धूने सांगितले की, केवळ त्याची पत्नीच नाही तर स्वत:ही हा डाएट फॉलो करत त्याच्या फॅटी लिव्हरवरही मात केलीय. ते या व्हिडीओमध्ये म्हणाले की, 'लोक म्हणतात ही श्रीमंत लोकांची आणि करोडो रुपयांचा औषधांची कमाल आहे. पण कडुलिंबाची पाने, कच्ची हळद, लिंबू आणि अॅप्पल साइडर व्हिनेगरची आपल्याला मदत झाल्याचे ते म्हणाले.  नवज्योत सिंग सिद्धू यांनी अमृतसरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हा दावा केला होता.


'कॅन्सरग्रस्त रुग्णांचा गोंधळ उडतो'


नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धूने 40 दिवसांत कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यावर मात केली. कोणत्याही ॲलोपॅथी औषधांशिवाय केवळ आहार आणि जीवनशैलीत बदल करून आपल्या पत्नीने कर्करोगावर मात केल्याचा दावा सिद्धू यांनी केला आहे. याद्वारे कर्करोग रुग्णांची दिशाभूल केली जात असल्याचे समाजाचे म्हणणे आहे. हे ऐकून देश-विदेशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांचा गोंधळ उडतो आणि ॲलोपॅथी औषधावरील विश्वास उडत चालला आहे.छत्तीसगड सिव्हिल सोसायटीचे संयोजक डॉ. कुलदीप सोलंकी यांनी हे विधान केले आहे.  


'सिद्धूने माफी मागावी'


आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, परंतु रुग्णाची गोपनीयता लक्षात घेऊन आम्ही ती उघड करत नाहीत. तरी सिद्धू यांनी या सर्व बाबींवर खुलासा करावा. सात दिवसांत त्यांनी उपचाराची कागदपत्रे सादर करावीत आणि माफी मागावी असे छत्तीसगड सिव्हिल सोसायटीने म्हंटलंय. अन्यथा 850 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा केला जाईल, असे त्यांनी म्हटलंय. 


समाजाने काय केल्या मागण्या केल्या?


आरोग्याबाबत तुमच्या पतीच्या दाव्यांचे तुम्ही पूर्ण समर्थन करता का? तुम्हाला विविध रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या ॲलोपॅथी औषधोपचाराचा काही फायदा झाला नाही का? कॅन्सरमुक्त होण्यासाठी फक्त आहार, लिंबू पाणी, तुळशीची पाने, हळद, कडुलिंबाची पाने खाऊन फायदा झाला, कोणते औषध वापरले नाही का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तुम्ही कोणत्याही औषध किंवा वैद्यकीय मदतीशिवाय फक्त तुमच्या आहारात बदल करून केवळ 40 दिवसांत चौथ्या स्टेजच्या कर्करोगावर मात केली असे म्हणताय तर तर आम्हाला 7 दिवसांच्या आत सर्व प्रमाणित कागदपत्रे द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.  


खुलासा करण्याची मागणी


नवज्योत कौर सिद्धू यांच्याकडे पतीच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही प्रमाणित दस्तऐवज किंवा वैद्यकीय पुरावे नाहीत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा, अशी मागणी छत्तीसगढ सिव्हिल सोसायटीने नोटीस पाठवून केली आहे. कारण यामुळे इतर कॅन्सर रुग्णांचा गोंधळ उडत असून नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विधानावर विश्वास ठेवून ते औषध सोडून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे ते म्हणाले.