नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांनी शेकऱ्याच्या समस्या मांडल्यानं सभागृतचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राचा आत्मा हा शेतकरीच आहे. या विषयावर संसदेत चर्चा होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आता शेतकऱ्यांची फार गंभीर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी तरुणांचे लग्नदेखील जमत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण याच बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या घरी मुली द्यायला, कुठलाही कन्येचा पिता तयार होत नाही. याच मुद्याने राणा यांनी सभागृहाचे आणि मोदी सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. 


शेतकऱ्याच्या आत्महत्या हा विषय चिंतेची बाब ठरत आहे. महाराष्ट्राचे हरीत क्रांतीचे जनक वसंतराव नाईक होते. मात्र त्याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा सारखा वाढतोय. महाराष्ट्र राज्य हे शेतकऱ्याच्या आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. 


महाराष्ट्रातील सतत दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट होत चालली आहे. देशातील मागल्या काही वर्षात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी ८० हजार शेतकऱ्याच्या आत्महत्या या महाराष्ट्रातील आहेत. 


विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाने ३३ वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.  तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकऱ्य़ांच्या आत्महत्येत प्रमाण वाढत आहे. ही, गंभीर बाब आहे, असे नवनीत राणा यांनी सभागृहात सांगितले.


यंदाही राज्यात चांगला पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्या जवळच्या मालाला थेट सरकारने खरेदी करावे, यासाठी आपण आदेश द्यावेत, अशी मागणी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. 


शेतकऱ्याची अशी गंभीर परिस्थिती असल्यानं आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या समस्या निर्माण होत आहे, असे राणा यांनी सांगितले.