मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या माजी खासदार निवेदिता माने शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यावरून माने गट नाराज आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आता निवेदिता माने आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


माने गट नाराज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने हे राष्ट्रवादी पक्षांकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघरातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादी पक्षाने हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना सोडण्याची तयारी दाखवल्यामुळं माने गट नाराज आहे.


'स्वगृही परत आलेय' 


'राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षात दुर्लक्ष होऊ लागल्यानं हा अस्तित्वाचा प्रश्न होता' असं निवेदिता माने यांनी म्हटलंय. 'मी स्वगृही परत आलेय' असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केल आहे.