नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल (Vice President of India Election Result 2022) जाहीर झाले आहेत. एनडीएच्या जगदीप धनकड यांचा दणदणीत विजय झाला आहे. धनकड यांनी यूपीएचे उमेदवार  मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. त्यामुळे यूपीएला राष्ट्रपतीपदापाठोपाठ आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही मोठा पराभव स्वीकारावा लागला. (vice president of india election result 2022 nda candidate jagdeep dhankar won )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपराष्ट्रपतीपदी एनडीएचे जगदीप धनकड यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. धनकड यांना 528 मतं मिळाली. तर मार्गारेट अल्वा (Margaret alva) यांना 182 मतं मिळाली. थोडक्यात धनकड यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे.  


पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सुमारे 93 टक्के खासदारांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केलं. तर 50 हून अधिक खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. या दांडीबहाद्दरांमध्ये शिवसेनेच्या खासदारांचाही समावेश आहे. शिवसेनेच्या एकूण 5 खासदारांनी मतदान केलं नाही. तर तृणमूल काँग्रेसने याआधीच मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली होती.