नवी दिल्ली : भाजपसाठी नेहमी संकटमोचकच्या भूमिकेत असणारे वरिष्ठ नेते वेंकैया नायडू यांना उपराष्ट्रपती पदासाठी भाजपने उमेदवारी दिली आहे. वेंकैया नायडू मोदी सरकारमधील सर्वात वरिष्ठ मंत्र्यांमधील एक नेते आहेत. दक्षिण भारतातील सर्वात जुने भाजप नेते देखील आहेत. 2002 ते 2004 दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील ते होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीएचे उपराष्ट्रपती पदांचे उमेदवार वेंकैया नायडू यांचा जन्म 1 जुलै 1949 रोजी आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात झाला. वेंकैया त्याच्या कॉलेज दिवसांपासूनत राजकारणात सक्रीय होते. 1973-74 मध्ये आंध्र विद्यापीठातील विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष होते. 1988 ते 1990 दरम्यान आंध्र प्रदेशचे भाजप अध्यक्ष होते.


इमरजेंसीच्या काळात ते जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी जोडले गेले. त्यावेळी ते जेलमध्ये देखील गेले. 1978 आणि 1983 मध्ये नेल्लोरमधून आमदार झाल्यानंतर 1998 मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. आता ते राजस्थानमधून राजसभेतील भाजपचे खासदार आहेत आणि मोदी सरकारमध्ये त्यांची भूमिका एका संकटमोचक नेता म्हणून आहे.


27 मे 2014 ते 5 जुलै 2016 पर्यंत वेंकैया नायडू हे मोदी सरकारमध्ये संसदीय कामकाज मंत्री होते. सध्या ते शहर विकास आणि माहिती प्रसारण मंत्री आहेत. विशेष गोष्ट म्हणजे वेंकैया नायडू हे 4 वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून गेले.