NEET UG 2024 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा यूजी (NEET UG) 2024 परीक्षेचा निकाल आज घोषित होणार आहे.विद्यार्थ्यांचे निकाल शहर आणि केंद्रनिहाय जारी करण्यात येणार आहे.दुपारी 12 वाजता निकाल घोषित करण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता एनटीए आता पुन्हा निकाल जारी करावे लागणार आहेत. ऑनलाइन पद्धतीनेच हे निकाल जारी करण्यात येणार असून एनटीएची ऑफिशियल वेबसाइट exams.nta.ac.in/NEET वर जारी करण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाइन पद्धतीने निकाल जारी होताच विद्यार्थी ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकणार आहेत. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून आज निकाल जारी केल्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठीचे वेळापत्रक घोषित करण्यात येणार आहे. शेड्युल आणि रँकच्या सहाय्याने समुपदेशनात भाग घेऊन विद्यार्थी मेडिकल, डेंटल, आयुष आणि नर्सिंग यासारख्या पाठ्यक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. 


यंदा नीट यूजी एक्झामसाठी 2406079 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. तर, त्यातील 2333297 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यात 1316268 उमेदवारांनी नीट परीक्षेत यश मिळवले होते. 


कसा पाहाल नीट रिझल्ट


एनटीए नीट 2024 निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाइटवर जावं लागेल. 


वेबसाइटच्या होम पेजवर लेटेस्ट न्यूजमध्ये रिझल्ट लिंकवर क्लिक करुन रिझल्ट चेक करावा लागेल


त्यानंतर तुम्हाला अॅप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ किंवा दिलेला सिक्युरिटी पिन टाकून लॉग इन करावा लागेल. 


आता तुमच्या स्क्रीनवर स्कोअरकार्ड येईल. ते तुम्ही डाउनलोड करुन ठेवू शकता. 


सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 


नीट पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी 40हून अधिक याचिकांवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस जेबी पारदीवाला आणि जस्टिस मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.ज्याने कोणी नीट पेपर लिक केला त्याचा हेतू नीट परीक्षेला बदनाम करण्याचा नाहीये तर पैसे कमावणे हा आहे. संपूर्ण देश नीट परीक्षेबाबतच्या निर्णयाची वाट पाहत आहे. त्यामुळं शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ऑनलाइन करा, असे आदेश सरन्यायाधीशांनी दिली आहे. तसंच, पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.