पुणे NEET UG Admit Card 2022 | : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश प्राधिकरणातर्फे (NTA) 17 जुलैला होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचे NEET  प्रवेशपत्र मंगळवारपासून  उपलब्ध करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनटीएच्या संकेतस्थळावरून  विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार असून,  देशभरातील 497 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. 


विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांकाचा वापर करून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. प्रवेशपत्राशिवाय विद्यार्थ्यांला केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.  नीट परीक्षा होणाऱ्या परीक्षा केंद्रांची यादी या पूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.


NEET UG Admit Card 2022 - या लिंकवर क्लिक करून प्रवेशपत्र डाऊनलोड करा