NEET UG Result 2023 Declared: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट यूजी 2023 चा निकाल घोषित केला आहे. जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी नीट युजीची प्रवेश परिक्षा दिली होती. परीक्षा दिलेले सर्व उमेदवार नीट युजीची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in च्या माध्यमातून आपलं स्कोअरकार्ड (NEET UG Scorecard 2023) पाहू तसंच डाऊनलोड करु शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रेंस टेस्ट यूजी (NEET UG) 2023 भारताबाहेरील 14 शहरांसह देशातील 499 शहरांमधील 4097 केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. 7 मे रोजी झालेल्या परीक्षेत एकूण 97.7 टक्के उमेदवारांनी हजेरी लावली होती. 


निकाल जाहीर होण्यात उशीर का?


मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेता नीट युजी परीक्षा 6 जूनला आयोजित करण्यात आली होती. NTA उमेदवारांना 10 शहरांमधून परीक्षा देण्याची संधी देण्यात आली होती. परीक्षेत जवळपास 8700 उमेदवार सहभागी झाले होते. मणिपूरमध्ये परीक्षेसाठी उशी झाल्याने नीट युजीचा निकाल येण्यातही उशीर झाला. 


मुलांमधील टॉपर्सची नावं


1. प्रबंजन जे
2. बोरा वरुण चक्रवर्ती
3. कौस्तव बाउरी
4. ध्रुव आडवाणी
5. सूर्या सिद्धार्थ एन
6. श्रीनिकेत रवि
7. स्वयं शक्ति त्रिपाठी
8. वरुण एस
9. पार्थ खंडेलवाल 


मुलींमधील टॉपर्स


1.प्रांजल अग्रवाल
2. आशिका अग्रवाल
3.आर्य आर.एस
4.मीमांशा मौन
5. सुमेघा सिन्हा
6.कानी यासाश्री
7.बरीरा अली
8.रिद्धि वजरिंगकर
9. कवलकुंतला प्रणति रेड्डी


NEET UG Result 2023: निकाल कसा आणि कुठे चेक करायचा?


1 - सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जावा
2 - होमपेजवर 'NEET UG 2023 Result' ची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. 
3: आता आपले लॉगिन डिटेल्‍स आणि रजिस्‍ट्रेशन नंबर तिथे भरा.
4: तुमचं नीट यूजी स्कोरकार्ड स्‍क्रीनव येईल. ते व्यवस्थित तपासून घ्या. 
स्‍टेप 5: नीट युजी निकाल स्कोरकार्ड डाउनलोड करा आणि प्रिंटआउट काढून तुमच्याकडे ठेवून द्या.