मुंबई : नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड्स ट्रान्सफर म्हणजेच एनईएफटीच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी खूशखबर आहे. आजपासून एनईएफटीची सेवा आठवड्याचे सातही दिवसरात्र उपलब्ध होणारेय. आरबीआयच्या निर्णयाचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी ही सेवा २४ तास उपलब्ध नव्हती. केवळ बँकेच्या कामकाजाच्या वेळातच एनईएफटीद्वारे व्यवहार करता येत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयनं यासंदर्भात निवेदन जारी केलंय. एनईएफटीच्या माध्यमातून एकावेळी २ लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन हस्तांतर करता येते. एनईएफटीअंतर्गत करण्यात येणारे व्यवहार बँकिंग यंत्रणेमार्फत सर्वसाधारण दिवशी सकाळ आठ वाजल्यापासून ते दुपारी एकपर्यंत पूर्ण करण्यात येतात.



बँकेच्या कामकाज वेळेनंतर व्यवहार केल्यास बँका आपणहून तो व्यवहार स्ट्रेट थ्रू प्रोसेसिंग माध्यमात वळता करतात. एनईएफटीद्वारे व्यवहार केल्यानंतर लाभार्थी खात्यात रक्कम जमा होण्यासाठी किमान दोन तासांचा कालावधी लागतो. हा नियम यापुढेही कायम राहणार असल्याचं आरबीआयनं सांगितलंय.