Nepal Banned Import Of Medicines : नेपाळच्या (Nepal) सरकाने भारत सरकारला एक मोठा धक्का दिला आहे. नेपाळने 16 भारतीय कंपन्याच्या औषधांच्या (Indian Pharmaceutical Companies) आयातीवर निर्बंध आणले आहेत. आफ्रिकेतील देशांमध्ये खोकल्याच्या सिरपमुळे मुलांच्या झालेल्या मृत्यूनंतर WHO ने यासंबंधीच्या सर्व औषधांबाबत चेतावणी जारी केली होती. WHO च्या अलर्टनंतर नेपाळने 16 भारतीय कंपन्यांच्या औषधांच्या आयातीवर बंदी घातलीये. नेपाळ औषध नियामक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या यादीमध्ये भारतीय औषध कंपन्यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळच्या औषध प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या यादीमध्ये दिव्या फार्मसीसह 16 भारतीय औषध कंपन्यांचा समावेश आहे. Divya Pharmacy ही योगगुरू रामदेव यांची पतंजली प्रोडक्ट्स तयार करतं.


बंदी घालण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये यांचा समावेश


नेपाळद्वारे जाहीर केलेल्या यादीमध्ये खालील भारतीय कंपन्यांचा समावेश आहे.


  • रेडियंट पॅरेन्टेरल्स लिमिटेड

  • मरकरी लेबोरेटरीज लिमिटेड

  • एलायंस बायोटेक

  • कॅपटॅब बायोटेक

  • एग्लोमेड लिमिटेड

  • जी लेबोरेटरीज लिमिटेड

  • डॅफोडिल्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड

  • जीएलएस फार्मा लिमिटेड

  • यूनिजूल्स लाईफ साइंस लिमिटेड

  • कॉन्सेप्ट फार्मास्युटिकल्स प्राइवेट


याशिवाय आनंद लाइफ सायंसेस लिमिटेड, आईपीसीए लेबोरेटरीज लिमिटेड, कॅडिला हेल्थकेयर लिमिटेड, डायल फार्मास्युटिकल्स, एग्लोमेड लिमिटेड आणि मॅकुर लेबोरेटरीज लिमिटेड सारख्या मोठ्या कंपन्यांच्या औषधांवरही बंदी घालण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या कंपन्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांचं पालन करण्यात अपयशी ठरल्या. त्यामुळे या कंपन्यांवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली.


ओषधांवर का आणली बंदी?


यावेळी विभाग प्रवक्ता संतोष केसी यांच्या सांगण्यानुसार, औषध कंपन्यांच्या मॅन्युफॅक्चरींग सुविधांच्या निरीक्षणानंतर, ज्यांनी त्यांचे प्रोडक्ट्स आमच्या देशात निर्यात करण्यासाठी अर्ज केला होता. आम्ही अशा कंपन्यांची यादी प्रकाशित केली जे WHO मानकांचं पालन करत नव्हत्या.


तपासणीमध्ये अपयशी ठरल्या होत्या कंपन्या


एप्रिल आणि जुलै यामध्ये विभागाने नेपाळला प्रोडक्ट्स पुरवण्यासाठी अर्ज केलेल्या फार्मास्युटिकल कंपन्यांच्या उत्पादन युनिटची तपासणी करण्यासाठी एक टीम पाठवली होती. काही कंपन्यांचे प्रोडक्ट्स नियामक गोष्टींचं पालन करत नव्हत्या. 


भारतातील हरियाणामध्ये तयार होणाऱ्या 4 कफ सिरपबाबत WHO ने अलर्ट जारी केलं होतं. गाम्बियामध्ये 66 बालकांच्या मृत्यूचं कारण Maiden Pharmaceuticals चे सिरप असल्याचं सांगण्यात आलं होतं. अशा दावा करण्यात आला होता की, लहान बालकांचा मृत्यू या कंपनीचं सिरप प्यायल्यामुळे झाला.