नेपाळमध्ये हॅलिकॉप्टर क्रॅश, पर्यटन मंत्री रवींद्र अधिकारी यांच्यासहित 6 जणांचा मृत्यू
नेपाळच्या गृह सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार टेराथम जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
नेपाळ : नेपाळमध्ये झालेल्या हॅलिकॉप्टर दुर्घटनेत पर्यटन मंत्री रवींद्र अधिकारी यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी आणखी 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. नेपाळच्या पूर्व भागातही दुर्घटना झाली आहे. नेपाळच्या गृह सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार टेराथम जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
हॅलिकॉप्टरमधून 6 जण प्रवास करत होते. हॅलिकॉप्टर नेपाळच्या डोंगरी भागातून उड्डाण करत होते. यावेळी ही दुर्घटना घडली. उड्डाण घेतल्या नंतर काही वेळानंतर काठमांडु येथील एअरपोर्ट टॉवर जाऊन हे विमान आदळले. दुर्घटना झालेले ठिकाण हे काठमांडुपासून 400 किलोमीटरवर आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर एअर डायन्सिटीचे आहे.
पर्यटन मंत्र्यांसोबत यावेळी हॅलिकॉप्टरचे पायलट कॅप्टन प्रभाकर केसी, पर्यटन व्यवसाशी संबंधित छिरिंग शेरपा, सुरक्षा रक्षक अर्जुन घिमरे, पंतप्रधानांच्या जवळचे मानले जाणारे युवराज चहल, विरेंद्र श्रेष्ठ आणि आणखी एक व्यक्ती सहभागी होता.
नेपाळी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पर्यटन पाथीभरा मंदीर येथे पर्यटन मंत्री निघाले होते. यानंतर ते पंचथार येथे जाणार होते. इथल्या चुहान दंडामध्ये काम सुरू असलेल्या एअरपोर्टची पाहणी करणार होते. या घटनेनंतर तात्काळ नेपाळच्या पंतप्रधानांनी आपत्कालिन बैठक बोलावली आहे.