Business Opportunity: नोकरीचं काय घेऊन बसलात? `हा` बिझनेस करून महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये
आज आम्ही तुम्हाला अशा बिझनेसबद्दल माहिती सांगणारआहोत, ज्याद्वारे तुम्ही 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत महिना कमवू शकतात.
Business Idea: अनेकांना बिझनेस करण्याची इच्छा असते पण कोणता बिझनेस करावा याचं उत्तर मिळतं नाही. बिझनेस (Business) म्हणजे मोठी गुंतवणूक असं अनेकांच मत असतं. पण, असे अनेक बिझनेसमन (Businessman) आहेत, ज्यांनी बिझनेसची सुरुवात छोट्या गुंतवणूकीतून सुरु केली आणि आज ते यशस्वी बिझनेसमन ठरलेत. आज आम्ही तुम्हाला अशा बिझनेसबद्दल माहिती सांगणारआहोत, ज्याद्वारे तुम्ही 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत महिना कमवू शकता.
सर्व सामानांसाठी कार्डबोर्डचा वापर केला जातो...
सध्या बरेचजण ऑनालाईन खरेदी करण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. सर्वसाधारण मोबाईलच्या दुकानापासून सर्व दुकानांमध्ये प्रोडक्ट पॅक करण्यासाठी कार्डबोर्डचा वापर केला जातो. कार्डबोर्डच्या (Cardboard) बिझनेसचा मोठ्या पातळीवर सुरु करुन जवळ-जवळ 5 लाख रुपयांपर्यंत महिन्याची कमाई करु शकता.
कच्चामाल ठरतो महत्वाचा...
या बिझनेसची सुरुवत करण्यासाठी मुलभूत गरज पडते ती क्राफ्ट पेपरची. क्राफ्ट पेपरच्या आधारावर हा बिझनेस सुरु केला जाऊ शकतो. सध्या 40 रुपये प्रति किलोच्या भावाने क्राफ्ट पेपर खरेदी करता येतो. क्राफ्ट पेपरची क्वालिटी जितकी चांगली तितका बॉक्स उत्तम क्वालिटीचा बनतो.
किती जागेची गरज आवश्यक असते?
या बिझनेसाठी जवळ-जवळ 5000 स्क्वेअर फूटाच्या जागेची आवश्यकता लागते. क्राफ्ट पेपरपासून बॉक्स बनवण्यासाठी मोठी जागा लागेल आणि त्याचबरोबर बनवलेले बॉक्स साठवण्याठी गोदाम देखील बनवावा लागेल. कार्डबोर्ड बॉक्सचा बिझनेस सुरु करण्याचं ठिकाण गर्दीचं नसावं. म्हणजे, तुम्हाला सामानची ने-आण करण्यासाठी परेशानी होणार नाही.
'या' मशिनींचा होतो वापर...
हा बिझनेस करण्यासाठी Semi Automatic Machine आणि Fully Automatic Machine या दोन मशिनींची आवश्यकता असते.
किती रुपयांचा फायदा मिळेल?
या बिझनेसची योग्य मार्केटिंग केली आणि डिमांड-सप्लायचं उत्तम व्यवस्थापन केलं तर यामधून 5 ते 10 लाख रुपये महिन्याला कमवले जाऊ शकतात.