Tirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावा
Tirupati Balaji Prasad Video : तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी खळबळ माजली असताना आता प्रसादात किडा सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Insect in curd rice at Annadana Center in Tirumala : गेल्या काही दिवसांपासून बालाजी तिरुपती मंदिर वादाच्या भोवऱ्यात अडकलंय. तिरुपती मंदिरात (Tirupati Temple) मिळणाऱ्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी देशात खळबळ उडली असताना पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झालाय. एका भक्ताने दुपारच्या जेवणाच्या प्रसादात किडे आढळून आल्याचा आरोप भक्ताने केलाय. ( New controversy after Tirupati Prasad Ladu case Insect in curd rice at Annadana Center in Tirumala video viral )
वारंगलचे रहिवासी भक्त चंदू या भक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यात संपूर्ण घटना सांगितली आहे. तो म्हणाला की, मंदिरात बुधवारी दुपारी केळी पानावर दही भात देण्यात आला. त्यात किडे होता, असा आरोप भक्ताने केलाय. दरम्यान मंदिर प्रशासनाने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.
धक्कादायक म्हणजे हा व्हिडीओ चंदूने मंदिर प्रशासनाला दाखवला असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया संतापजनक होती. ते म्हणाले की, कधी कधी घडते असं. यानंतर त्यांनी प्रसादाचा फोटो आणि व्हिडिओ घेऊन मंदिर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी प्रथम हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही आणि नंतर त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, आरोप भक्ताने केलाय.
दरम्यान टीटीडीने प्रकरणावर स्पष्टीकरण देताना असा आरोप केलाय की, या अशाप्रकारचे आरोप करून भक्तांना भगवान व्यंकटेश्वरावरील त्यांच्या श्रद्धेपासून दूर करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे. तसंच ते संस्थेला बदनाम करण्याचे साधन आहे, असं त्यांनी आरोप केला. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, सीबीआयच्या मदतीने एक विशेष तपास पथक (एसआयटी) लाडूमधील मिलवॉटरच्या दाव्याची चौकशी सध्या करत आहेत.