नवी दिल्ली: दिल्लीत शास्त्रीनगर मेट्रो स्टेशनवर घडलेला अजब प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. मयूर पटेल नावाच्या २१ वर्षीय तरूणाने चक्क एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मेट्रोचा ट्रॅक क्रॉस केला. त्याचवेळी स्थानकावर उभी असलेली मेट्रो सुरू झाली. या दरम्यान या युवकाला प्लॅटफॉर्मवर चढता येईना. गाडीचा हलकासा धक्काही त्याला लागला. मात्र मेट्रो पायलटने गाडी थोडक्यात थांबवल्यामुळे या युवकाचा अपघात झाला नाही. गाडी सुरू झाल्याचं पाहताच हा युवक गाडीच्या पुढे धावत सुटला... थोडक्यात या तरूणाचे प्राण वाचले. अखेर मेट्रो अधिकाऱ्यांनी मयूर पटेलवर दंडात्मक कारवाई केली.