मुंबई : New MG ZS EV facelift 2022 : MG मोटार आपली इलेक्ट्रिक कार ZS EV ची फेसलिफ्ट कार फेब्रुवारी 2022 च्या तिसऱ्या आठवड्यात लाँच करणार असल्याची माहिती मिळत आहे. नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही. फेसलिफ्टेड ZS EV 2022 मध्ये ZS EV SUV च्या सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त बॅटरी असणार आहे. नवीन फेसलिफ्ट SUV MG ZS EV 2022 50kWh बॅटरी पॅकसह येईल. एकदा पूर्ण चार्ज केल्यास ही कार 500 किलोमीटरपर्यंत धावू शकते.(MG Motor Facelift ZS EV 2022)


कारची वैशिष्ट्ये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन MG मोटर ऑल-इलेक्ट्रिक कारमध्ये प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) देखील असण्याची शक्यता आहे. 


फेसलिफ्टेड ZS EV 2022 कंपनीच्या जागतिक UK डिझाइन प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. 


इन्फोटेनमेंटसाठी, फेसलिफ्ट MG ZS EV 2022 ला 10.1-इंच डिजिटल कॉकपिट मिळेल. 


MG Motor ZS EV 2022 ची नवीन फेसलिफ्ट ही सध्याच्या मॉडेलप्रमाणेच पॉवर आउटपुट जनरेट करेल अशी अपेक्षा आहे. 


MG ZS EV चे सध्याचे मॉडेल 143 PS पॉवर आणि 350 Nm टॉर्कसह येते आणि ते 8.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते.



किंमत किती


MG ZS EV चे सध्याचे मॉडेल 44.5 kWh बॅटरीसह येते आणि ही कार 419  किमी धावू शकते. या कारची किंमत 21.49 लाख रुपये सुरू होते. 


फेसलिफ्ट ZS EV कारची किंमत 22 लाख ते 25 लाख दरम्यान असण्याची शक्यता आहे. (New MG ZS EV facelift 2022)