नवी दिल्ली : New PUC Rules वाहनांच्या पीयुसी सर्टिफिकेट म्हणजेच  PUC सर्टिफिकेटचा मुद्दा अनेकदा गांभीर्यानं घेतला जात नाही. किंबहुना आपल्या देशात अद्यापही एखादं वाहन किती प्रदुषण करतं याचं प्रमाण तपासून पाहण्याची मानसिकता तशी कमीच. प्रदूषणाच्या प्रमाणाची पडताळणी करण्याच्या नावाखाली फक्त PUC सर्टिफिकेट बनवण्याचीच प्रक्रिया केली जाते. पण, आता मात्र हा हलगर्जीपणा महागत पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देशभरात PUC सर्टिफिकेटला अधिक महत्त्वं 
PUC सर्टिफिकेट संदर्भात शासनानं अतिशय महत्त्वाचा नियम तयार केला असून, आता संपूर्ण देशात याची एकत्रितरित्या अंमलबजावणी केली जाणार आहे. सोबतच PUC ला नॅशनल रजिस्टरशी लिंकही केलं जाणार आहे. तुमचं वाहन किती प्रदूषण करतं, हे जाणून घेण्यासाठी एका ठराविक काळानंतर तुम्ही त्यासाठीची आवश्यक चाचणी करणं बंधनकारक असेल. ज्यानंतरच तुम्हाला PUC सर्टिफिकेट मिळू शकेल. सध्याच्या घडीला प्रत्येक राज्यात PUC सर्टिफिकेटचे वेगवेगळे प्रकार आढळतात. पण, यापुढे मात्र देशात या सर्टिफिकेटचा एकच प्रकार असेल. शिवाय यामध्ये काही नवे फिचर्सही जोडण्यात येणार आहेत. 


पदकविजेत्या मीराबाईला जमिनीवर बसून जेवताना लोकप्रिय अभिनेता असं काही म्हणाला की... 


 


PUC सर्टिफिकेट नियमांमधील महत्त्वाचे मुद्दे 
- रस्ते परिवहन मंत्रालयानं PUC चा नवा फॉरमॅट तयार केला आहे. देशभरात हा फॉरमॅट एकसमान असेल. 
- PUC फॉर्मवर एक क्यूआर कोड असेल, ज्यामध्ये वाहन मालक, त्यांचं अॅनिमेशन स्टेटस म्हणजेच गाडी किती धुर बाहेर टाकतेय याची नोंद असेल. 
- PUC सर्टिफिकेट डेटाबेसला नॅशनल रजिस्टरशी जोडलं जाईल. 
- PUC मध्ये वाहनाच्या मालकाचा दूरध्वनी क्रमांक, त्यांचा पत्ता, वाहनाचा इंजिन नंबर असणं अनिवार्य असेल. 
- दूरध्वनी क्रमांकावर वॅलिडेशन आणि फी साठीचे मेसेज अलर्ट येत राहतील. 
- यामध्ये पहिल्यांदाच रिजेक्शन स्लीपची तरतूद करण्यात आली आहे. जर कोणत्या गाडीमध्ये प्रदूषणाची पातळी जास्त आहे तर त्या वाहनाला रिजेक्शन स्लीप देण्यात येईल. 
- ही स्लीप घेून तुम्हाला गाडीच्या सर्विसिंगसाठी सर्विस सेंटरमध्ये जावं लागेल. 
वाहनधारकांच्या दृष्टीनं ही बातमी आणि हे नियम अतिशय महत्त्वाचे असेच आहेत. त्यामुळं यापुढे पीयुसीकडे हलगर्जीपणाच्या नजरेतून पाहू नका.